ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
केळ हे असे फळ आहे जे सर्वांनाच खुप आवडते. केळी हि शरिरासाठी चांगली आणि अत्यंत फायदेशीर आहेत.
पण जास्त पिकलेली केळी लवकर काळी पडून खराब होण्यास सुरुवात होते. तर जाणून घ्या केळी स्टोर करण्याच्या योग्य टिप्स.
केळ्यांना साधारण रुम टेंपरेचरमध्ये ठेवावे. जास्त गरमी असलेल्या ठिकाणी ठेवू नये.
केळ्याच्या देठाला अॅल्युमिनियम फॉईल लावा. असे केल्यास केळ लवकर काळे पडून खराबसुध्दा होणार नाही.
केळी आणल्यावर ती धुवून स्वच्छ करुन तुम्ही ठेवू शकता. त्यांना प्लास्टिकच्या आवरणाने किंवा इतर कोणत्याही भांड्याने झाकू नका.
केळी तुम्ही टांगून सुध्दा ठेवू शकता. यामुळे ते कमी पिकले जातील आणि काळे पण पडणार नाही.
केळी इतर फळांसोबत ठेवणे टाळावे. यामुळे ती लवकर पिकू शकतात.
जर तुम्ही केळी इतर कोणत्याही प्रकारे साठवू शकत नसाल, तर त्यांना फ्रिजमध्ये ठेवा. थंडाव्यामुळे केळी खराब होण्यापासून वाचतील.