Beach Camping : फ्रेंड्स सोबत या वीकेंडला करा बीच कॅम्पिंगचा प्लान, लोकेशन आताच नोट करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अलिबाग

अलिबाग हे मुंबईजवळील लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. अलिबागमधील सगळेच समुद्रकिनारे प्रसिध्द आहेत. आता तुम्हाला अलिबागच्या बीचवर कॅम्पिंगचा अनुभव घेता येणार आहे.

Alibaug | GOOGLE

अलिबाग कुठे आहे?

अलिबाग रायगड जिल्ह्यात आहे. मुंबईपासून साधारण 95 ते 100 किमी अंतरावर असून बाय रोड, फेरी आणि बसने सहज अलिबाग पोहोचता येते.

Alibag | yandex

अलिबागला कसे जायचे?

गेटवे ऑफ इंडिया वरुन फेरी करा आणि मांडवाला उतरा. तेथे उतरल्यावर बस करा ती तुम्हाला 30 मिनिटांत अलिबागला पोहोचवेल. बाय रोडने जाण्यासाठी पनवेलमार्गे बसचा किंवा कारचा वापर करा.

Mumbai Jetty | GOOGLE

बीच कॅम्पिंग म्हणजे काय?

समुद्रकिनाऱ्याजवळ टेंट लावून राहण्याचा अनुभव म्हणजे बीच कॅम्पिंग. रात्रीच्या लाटा, थंडगार वारा आणि मित्रांचीसोबत एक अगळा वेगळा अनुभव घेता येतो.

Beach Camping | GOOGLE

सुविधा

टेंट, गादी-उशी,संध्याकाळचा नाश्ता, रात्रीचे जेवण, BBQ, कॅम्पफायर, म्यूझिक आणि सकाळचा नाश्ता अशी सुविधा सगळ्या कॅम्प्समध्ये दिली जाते.

Fire | GOOGLE

कॅम्पिंगची मज्जा घेणे

सनसेट आणि सनराईज पाहणे, कॅम्पफायरभोवती गप्पा मारत बसणे, लाईव्ह म्युझिक आणि डान्स करणे, बीच वॉक आणि फोटोग्राफी यासाठी कॅम्पिंग बेस्ट मानली जाते.

Beach Camping | GOOGLE

कोणासाठी योग्य?

कपल्स, फ्रेंड्स आणि फॅमिली वीकेंड ट्रिपसाठी अलिबाग बीच कॅम्पिंग परफेक्ट ठिकाण आहे.

Beach Camping | GOOGLE

अलिबाग बीच कॅम्पिंग

रोजच्या धावपळीच्या जीवनातून स्व:ताला ब्रेक मिळण्यासाठी येथे तुम्ही रिलॅक्स होण्यासाठी जावू शकता. अलिबाग बीच कॅम्पिंग एक परफेक्ट वीकेंड गेटवे आहे.

Beach Camping | GOOGLE

Mumbai : मुलं घरात राहून कंटाळी? मग वीकेंडला मुंबईतील 'या' ठिकाणी करा पिकनिक प्लान

Mumbai | GOOGLE
येथे क्लिक करा