ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मुंबई हि स्वप्नांची नगरी म्हणून ओळखली जाते. येथे फिरण्यासाठी अनेक पर्यटनस्थळे आहेत. तसेच लहान मुलांच्या मनोरंजनासाठी अनेक ठिकाणे मुंबईत स्थित आहेत. जाणून घ्या लहान मुलांची फिरण्याची ठिकाणे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे बोरीवली येथे स्थित आहे. लहान मुलांच्या विरंगुळासाठी ही जागा मजेशीर आहे. येथे कान्हेरी लेणी, जंगल सफारी आणि सायकलिंग करता येते.
मुलांसाठी हे शैक्षणिक आणि मनोरंजक ठिकाण आहे. इथे विविध प्रकारचे मासे आणि जलचर पाहायला मिळतात.
हे ठिकाण शांत आणि हिरवळ असलेली जागा आहे . लहान मुलांना खेळण्यासाठी आणि संध्याकाळी फिरण्यासाठी हे ठिकाण योग्य मानले जाते.
एसेल वर्ल्ड हे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंतचे लोकप्रिय पार्क आहे. येथे सगळ्यांसाठी राईड्स उपलब्ध आहेत. सुट्टिच्या दिवशी तुम्ही येथे मुलांना घेवून जाऊ शकता.
ज्यांना इतिहास जाणून घेण्याची आवड आहे त्यांच्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. येथे शांत आणि अभ्यासपूर्ण वातावरण असते. मुलांना कला आणि इतिहासाची ओळख करुन द्यायची असेल तर हे ठिकाण परफेक्ट आहे.
नेहरू तारांगण हे ठिकाण वरळी येथे स्थित आहे. मुलांसाठी मुंबईत भेट देण्यासाठीचे बेस्ट ठिकाण आहे. मुलांसाठी येथे माहितीपूर्ण शो आणि प्रदर्शनं असतात.
जुहू बीच हा सांताक्रुझ मधील प्रसिध्द समुद्रकिनारा आहे. येथे संध्याकाळच्या वेळीस प्रचंड गर्दी पाहण्यास मिळते. जुहू बीचवरील सनसेट पाहण्यासाठी लोक खास करुन गर्दी करतात. तसेच तेथे चाट, भेळपुरी, पाणीपुरीचा आस्वाद घेता येतो.