ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पालघर जिल्ह्यातील सनफ्लॉवर फार्म हे फोटोग्राफीसाठी आणि निसर्गप्रेमींकरिता एक सुंदर हिडेन ठिकाण आहे. सर्वत्र सनफ्लॉवर पसरलेले बघून मन अगदी आनंदी होऊन जाते.
हा सनफ्लॉवर फार्म पालघर परिसरात असून मुंबईपासून २ ते ३ तासांच्या अंतरावर आहे. वीकेंड ट्रिपसाठी तुम्ही येथे भेट देऊ शकता.
डिसेंबर ते फेब्रुवारी हा काळ सनफ्लॉवर फुलण्याचा काळ आहे. या काळात तुम्ही भेट देऊ शकता. सकाळची वेळ खास करून फोटोग्राफीसाठी बेस्ट आहे. सनलाईटच्या प्रकाशात फोटोज नीट येतात.
शहराच्या गोंगाटापासून लांब शांत ठिकाणी हे फार्म वसलेले आहेत. निळं मोकळ आकाश, असंख्य सूर्यफुलांची रांग आणि अंगाला लागणारा थंडगार वारा यामुळे तेथे गेल्यावर मन एकदम प्रसन्न होते.
इंस्टाग्राम फोटो, रील्स आणि युटूब व्हिडिओसाठी हा फार्म खूप फेमस आहे. सनफ्लॉवर फुलांमध्ये क्लिक केलेले फोटो खूपच आकर्षक दिसतात. तसेच ही जागा प्री-वेडिंग शूटसाठी प्रचंड प्रमाणात फेमस झाली आहे.
कपल्स, फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण छान आहे. छोटा पिकनिक प्लॅन देखील इथे करु शकता.
मुंबईहून ट्रेनने पालघर स्टेशनपर्यंत जा. मग तिथून ऑटो किंवा कारने मॅप लावून फार्मपर्यंत सहज पोहोचता येत.
निसर्ग, शांतता, सुंदर फोटो आणि काही तरी वेगळा अनुभव घेण्यासाठी या ठिकाणाला भेट द्यावी.