Bihar Congress Crisis: Show-cause Notices To 29 Leaders, 72 Hours To Explain saam tv
देश विदेश

Congress Internal Rift: काँग्रेसमध्ये चाललंय काय? माजी आमदारासह तब्बल २९ नेत्यांना धडाधड आल्या नोटीस, नेमकं प्रकरण आहे काय?

Congress Internal Rift : बिहार काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद चिघळला असून पक्षविरोधी कारवाया आणि कथित शिस्तभंगाच्या प्रकरणात २९ नेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नवी दिल्लीतील AICC मुख्यालयाजवळ बिहार प्रदेश काँग्रेसच्या नेतृत्वाविरोधात काही नेत्यांनी आंदोलन केले होते.

Bharat Jadhav

  • बिहार काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा चर्चेत आला आहे.

  • माजी आमदारासह तब्बल २९ नेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे वृत्त आहे.

  • पक्षविरोधी कारवाया आणि कथित शिस्तभंगाच्या मुद्द्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसात काँग्रेस पक्षात फेरबदलाचे वारे वाहत आहेत. खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी पक्षात संघटनात्मक बदल करत आहेत. आगमी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षात बदल केले जात असल्याचं म्हटलं जातंय. मात्र त्याचदरम्यान काँग्रेस तब्बल २९ नेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीय. नेमकं हे प्रकरण काय आहे हे जाणून घेऊ.

त्याच झालं, असं बिहारमधील काँग्रेस पक्षात आलबेल नसून अंतर्गत वाद उफाळून आलेत. तेथील नेत्यांना या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. नवी दिल्लीतील AICC मुख्यालयाजवळ बिहार प्रदेश काँग्रेसच्या नेतृत्वाविरुद्ध काही नेत्यांनी आंदोलन लेी होती. या प्रकरणासंदर्भात त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.संबंधित नेत्यांना ७२ तासांच्या आत स्पष्टीकरण सादर करण्यास सांगण्यात आले आहे. या नोटीसमुळे बिहार काँग्रेसच्या नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. गुरुवारी, बिहार प्रदेश काँग्रेस समितीच्या शिस्तपालन समितीने पक्षविरोधी कारवाया आणि शिस्तभंग केल्याप्रकरणी २९ नेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावलीय.

ही कारवाई का करण्यात आली?

मिळालेल्या माहितीनुसार ८ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्ली येथील AICC मुख्यालयाजवळ बिहार प्रदेश काँग्रेसच्या नेतृत्वाविरुद्ध आयोजित निदर्शनांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्यामुळे ही कारवाई करण्यात आलीय. बिहार प्रदेश काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष कपिलदेव प्रसाद यादव यांनी एक नोटीस जारी केली आहे. त्यात संबंधित नेत्यांचा सदर कृतीमधील सहभाग हा पक्षाचे धोरण, शिस्त आणि निर्देशांचे उल्लंघन असून, तो घोर शिस्तभंग मानला जाईल, असं म्हटलंय.

७२ तासांच्या आत स्पष्टीकरण सादर करणे आवश्यक

या नोटीसद्वारे संबंधित सर्व नेत्यांना निर्देश देण्यात आले आहेत की, नोटीस मिळाल्यापासून ७२ तासांच्या आत त्यांनी 'बिहार प्रदेश काँग्रेस कमिटी'च्या शिस्तभंग समितीकडे आपले लेखी स्पष्टीकरण सादर करावे. तसेच, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, याचे कारणही त्यांना स्पष्ट करण्यास सांगण्यात आले आहे.

स्पष्टीकरण न मिळाल्यास करावयाची कारवाई

समितीने स्पष्ट केले आहे की, विहित मुदतीत स्पष्टीकरण न मिळाल्यास किंवा दिलेला प्रतिसाद असमाधानकारक आढळल्यास, पक्षाच्या नियमांनुसार संबंधित नेत्यांविरुद्ध एकतर्फी शिस्तभंगाची कारवाई करण्यास समिती मोकळी असेल. या नोटीसीमुळे संबंधित पक्षनेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

यात सहभागी असलेले २९ नेते कोण आहेत?

ज्या २९ नेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे आणि ज्यांच्याकडून खुलासा मागवण्यात आला आहे, त्यामध्ये माजी आमदार अनिल सिंग व पूनम देवी; पश्चिम चंपारणचे माजी जिल्हाध्यक्ष भरत भूषण दुबे; औरंगाबादचे माजी जिल्हाध्यक्ष मृत्युंजय सिंग; मधेपुराचे माजी जिल्हाध्यक्ष सत्येंद्र यादव; आणि सिवानचे माजी जिल्हाध्यक्ष विधू शेखर पांडे आदींचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT