bridge collapse in bihar Saam tv
देश विदेश

bridge collapse in bihar : बिहारमध्ये मागील ११ दिवसांत ५ वा पूल कोसळला; आसपासच्या गावांशी संपर्क तुटला

bridge collapse in bihar : बिहारमध्ये मागील ११ दिवसांत पाचवा पूल कोसळण्याची घटना घडली आहे. पूल कोसळल्यामुळे आसपासच्या गावाशी संपर्क तुटला आहे. तर यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Vishal Gangurde

बिहार : बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील झंझापूरमध्ये शुक्रवारी आणखी एक पूल कोसळल्याची घटना घडली आहे. बिहारमध्ये मागील ११ दिवसांत पूल कोसळण्याची पाचवी दुर्घटना घडली आहे. पूल कोसळल्यानंतर आसपासच्या गावांशी संपर्क तुटला आहे.

बिहारमध्ये शुक्रवारी भूतही नदीवरील पूलाचा गर्डर कोसळला. प्रशासनाने कोसळलेल्या गर्डर प्लास्टिकच्या ताडपत्रीने झाकला. बिहारमधील हा पूल ग्रामीण विकास विभागाद्वारे बांधण्यात येत आहे. प्रंधानमंत्री ग्रामीण रस्ते योजना या अंतर्गत हा पूल बांधण्यात येत आहे. या पूलासाठी ३ कोटी रुपये प्रस्तावित आहेत.

या पुलाचा गर्डर शुक्रवारी कोसळला. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने पूल कोसळल्याची माहिती कंत्राटदार अमरनाथ झा यांनी दिली. पाण्याची पातळी कमी झाल्यावर पूल पुन्हा बांधण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पूल कोसळल्यावरून आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार सरकारवर निशाणा साधला आहे. 'मागील ९ दिवसांत ५ वा पूल कोसळला आहे. मधुबनी-सुपौल दरम्यान भूतही नदीवरील निर्माणाधीन पूल कोसळला आहे. तुम्हाला कळालं का? असा सवाल करत तेजस्वी यांनी निशाणा साधला आहे.

दरम्यान, बिहारमधील पूल कोसळण्याच्या घटना देशभरात चर्चेचा विषय झाला आहे. बिहारमध्ये याआधी १८ जून रोजी पूल कोसळल्याची पहिली घटना घडली. बकरा नदीवरील १२ कोटीचा निर्माणाधीन पूल कोसळला होता. त्यानंतर २२ जून रोजी ४५ वर्ष जुना पूल कोसळला होता. त्यानंत दुसऱ्या दिवशी पूर्व चंपारणमध्ये पूल कोसळला. त्यानंतर २७ जूनला किशनगंज जिल्ह्यातील सहायक नदीवरील पूल कोसळला. आता मधुबनी जिल्ह्यात शुक्रवारी भूतही नदीवरील निर्माणाधीन पूल कोसळल्याची घटना घडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT