Karnataka Accident: भाविकांवर काळाची झडप, खासगी बस-ट्रकची धडक; अपघातात १३ जण ठार

Bus And Truck Accident In Karnataka: पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि मिनी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये १३ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Karnataka Accident: भाविकांवर काळाची झडप, खासगी बस-ट्रकची धडक; अपघातात १३ जण ठार
Karnataka Accident Saam Tv

कर्नाटकमधून मोठी बातमी समोर आली आहे. कर्नाटकमध्ये शुक्रवारी पहाटे भीषण रस्ते अपघात झाला. देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि मिनी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. कर्नाटकच्या हावेरी जिल्ह्यामध्ये ही घटना घडली. पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरू आहे.

Karnataka Accident: भाविकांवर काळाची झडप, खासगी बस-ट्रकची धडक; अपघातात १३ जण ठार
VIDEO: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण, डॉ. अजय तावरेला जामीन मिळणार का?; आज होणार सुनावणी

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे कर्नाटकमध्ये अपघाताची ही घटना घडली. हावेरी जिल्ह्यातील पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. हावेरी जिल्ह्यातील बागडी तालुक्यातील गुंडेनहल्ली क्रॉसजवळ ट्रक आणि मिनी बसची धडक झाली. या अपघातामध्ये बसमधील १३ भाविकांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. हे सर्वजण देवदर्शनावरून आपल्या गावाकडे जात होते त्याचवेळी हा अपघात झाला.

Karnataka Accident: भाविकांवर काळाची झडप, खासगी बस-ट्रकची धडक; अपघातात १३ जण ठार
Pune Accident News: पुणे- नाशिक महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅक्टर- कारची समोरासमोर धडक; १ ठार, ३ जखमी

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गवर ट्रक थांबला होता. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या भरधाव मिनी बसने ट्रकला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये बसचा चक्काचूर झाला. अपघातामध्ये बसमधील भाविकांचा जागीच मृत्यू झाला. मृतांचे मृतदेह बाहेर काढणे देखील कठीण झाले होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना बसमधून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.

Karnataka Accident: भाविकांवर काळाची झडप, खासगी बस-ट्रकची धडक; अपघातात १३ जण ठार
Pune Porsche Car Accident: पुणे अपघात प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, मृत तरुणीच्या भावाची मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातामध्ये मृत्यू झालेले आणि जखमी झालेले सर्वजण शिवमोग्गा येथील रहिवासी आहेत. हे सर्वजण बेळगाव जिल्ह्यातील सावदट्टी येथून यल्लम्माच्या दर्शनासाठी गेले होते. देवीचे दर्शन घेऊन परत येत असताना त्याच्यावर काळाने झडप घातली. अपघातामध्ये जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सांगितले की, बस चालकाला झोप लागल्यामुळे हा अपघात झाला. पुढील तपास सुरू केला जात आहे.

Karnataka Accident: भाविकांवर काळाची झडप, खासगी बस-ट्रकची धडक; अपघातात १३ जण ठार
Malshej Ghat Accident: माळशेज घाटाची सफर जिवावर बेतली! बस- दुचाकीचा भीषण अपघात; मुंबईतील तरुण- तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com