VIDEO: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण, डॉ. अजय तावरेला जामीन मिळणार का?; आज होणार सुनावणी
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी (Pune Porsche Car Accident) महत्वाची बातमी समोर येत आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या डॉक्टर अजय तावरेच्या (Dr. Ajay Taware) च्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. पुणे सत्र न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार आहे. अजय तावरे हे ससून ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणातील मास्टर माइंड आहे. अजय तावरेला आज जामीन मिळणार की नाही हे थोड्याच वेळात न्यायालयाच्या सुनावणीनंतर समजेल.
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपी मुलाच्या रक्ताच्या रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी डॉक्टर अजय तावरेला अटक करण्यात आली होती. याप्रकरणात ससून रुग्णालयाचे डॉक्टर अजय तावरे, श्रीहरी हळनोर आणि शिपायी अतुल घटकांबळे यांना अटक करण्यात आली होती. आरोपी मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार करण्यासाठी या सर्वांनी पैसे घेतल्याचे तपासातून उघड झाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.