Pune Video: पुणे ड्रग्ज प्रकरणी पोलीस 'ॲक्शन' मोडवर! लिक्विड लिजर लाउंज हॉटेल होणार सील; 5 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Pune Narcotics Case: पुण्यातल्या लिक्विड लिजर लाउंज हॉटेल्समध्ये सर्रासपणे ड्रग्ज पार्टी होत असल्याचा व्हिडीओ समोर आलाय. यानंतर आता पोलिसांनी मोठी कारवैय करत 5 जणांना ताब्यात घेतलं आहे.
पुणे ड्रग्ज प्रकरणी पोलीस 'ॲक्शन' मोडवर! लिक्विड लिजर लाउंज हॉटेल होणार सील; 5 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
Pune Narcotics CaseSaam Tv

अक्षय बडवे, साम टीव्ही, पुणे प्रतिनिधी

पुण्यातल्या लिक्विड लिजर हॉटेल्समध्ये सर्रासपणे ड्रग्ज पार्टी होत असल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या हॉटेलमध्ये गुन्हे शाखेची अमली पदार्थ विरोधी पथक दाखल झाले असून त्यांनी 5 जणांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी हॉटेलचा मालक, त्याचे तीन पार्टनर आणि एक कर्मचाऱ्याला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. तसेच हे हॉटेल सील केलं जाणार असल्याची माहितीही समोर आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरण सिंह राजपूत देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुणे पोलीस तसेच गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून या संपूर्ण पार्टीचे विश्लेषण सुरू करण्यात आलं आहे. यासोबतच लिक्विड लिजर लाउंज या हॉटेलमधील सीसीटीव्हीचे डीव्हीआर पुणे पोलिसांनी जप्त केले आहेत.

पुणे ड्रग्ज प्रकरणी पोलीस 'ॲक्शन' मोडवर! लिक्विड लिजर लाउंज हॉटेल होणार सील; 5 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
Nagpur Crime : चोरीच्या प्रकरणात वाठोडा पोलिसांनी दोघांना केली होती अटक; तपासात धक्कादायक माहिती आली समोर

पोलिसांनी ज्या दोन जणांना ताब्यात घेतलं आहे, त्यांच्याकडून पार्टी संबंधित चौकशी केली जाणार आहे. पुणे पोलीस हे या संपूर्ण घटनेचा तपास करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, काहीच वेळात पोलीस लिक्विड लिजर लाउंज हॉटेल सील करणार आहे.

या ठिकाणी अमली पदार्थ विरोधी पथकही दाखल झालं असून या ठिकाणी ड्रग्ज कोण पुरवत होतं? या तरुनानकडे जे ड्रग्ज होतं, ते कुटून आलं? याची विक्री कोणी केली? याची तपासणी आता करण्यात येत.

पुणे ड्रग्ज प्रकरणी पोलीस 'ॲक्शन' मोडवर! लिक्विड लिजर लाउंज हॉटेल होणार सील; 5 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
Sushma Andhare Video: मी हवेत बोलत नाही... अजून पुरावे देते, सुषमा अंधारे यांचा गुलाबराव पाटील यांना इशारा

यातच पुणे पोलिसांनी या हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आहे. यामध्ये व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा येथीलच असल्याचं निष्पन्न झालं आहे. तसेच येथे उशिरा रात्रीपर्यंत पार्टी सुरू होती, अशी माहितीही समोर आली आहे. पुणे गुन्हे शाखा आणि अमली पदार्थ विरोधी पथकाकडून पुढील तपास सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com