bihar bandh viral video bjp workers stop pregnant woman car x
देश विदेश

Viral : आंदोलनाच्या नावाखाली गुंडगिरी! गरोदर महिलेला रुग्णालयात घेऊन जाणारी गाडी भाजप कार्यकर्त्यांनी अडवली, Video

Viral Video : बिहारमध्ये राज्यस्तरीय पातळीवर आंदोलन सुरु आहे. मोदी यांच्या आईचा अपमान केल्याने एनडीएने बिहार बंदची हाक दिली आहे. या आंदोलनादरम्यान एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Yash Shirke

  • मोदींच्या आईच्या अपमानामुळे एनडीएने बिहार बंदची हाक दिली.

  • आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी गरोदर महिलेला रुग्णालयात जाणारी गाडी रोखली.

  • आरजेडीने व्हिडीओ शेअर करून भाजपवर गंभीर आरोप केले.

Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचा अपमान केल्याने एनडीएतर्फे बिहारमध्ये 'बिहार बंद' जाहीर करण्यात आला. बंद सुरु असताना भाजप कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी रस्त्यांवरील वाहनांना रोखून रस्ते अडवले. आंदोलनादरम्यान राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या विरोधात घोषणाबाजी करुन ठिकठिकाणी निदर्शन केली जात आहे. आंदोलन सुरु असताना अग्निशमन दलाच्या वाहनांना, रुग्णवाहिकांना आणि आपत्कालीन सेवांमधील वाहनांना सूट देण्यात आली आहे. यादरम्यान राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) एक व्हिडीओ शेअर करत भाजपवर हल्लाबोल केला आहे.

आरजेडीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका भारती यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. महिला गर्भवती आहे. तिला प्रसूतीसाठी रुग्णालयात न्यायचे आहे. पण या गुंडांनी बिहार बंदच्या नावाखाली रस्ता बंद केला आहे. आजच हिला पोटदुखी व्हायला हवी होती, असे ते लोक म्हणाले. मोदीजी, तुमचे लोक गर्भवती महिलांशी गैरवर्तन करत आहेत, असे व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

व्हिडीओमध्ये भाजपचे कार्यकर्ते आणि स्थानिकांमध्ये वाद सुरु असल्याचे दिसते. महिलेला प्रसूती वेदना होत आहेत. तिला रुग्णालयात न्यायचे आहे, असे गाडीतील लोक वारंवार म्हणत असतात. यावर एकजण जर ती गर्भवती आहे, तर तुम्ही तिला आधी का नेलं नाही? सकाळी ७ वाजल्यापासून बंद सुरु आहे, असे म्हणाला. दुसऱ्या कार्यकर्त्याने हस्तक्षेप करत रुग्णांचे वाहन थांबवले जात नाहीये. आम्ही दुसऱ्या मार्गाने वाहन बाहेर काढत आहोत, हे स्पष्ट केले.

राहुल गांधी यांच्या वोटर अधिकार यात्रेदरम्यान काँग्रेसच्या व्यासपिठावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईला शिवीगाळ करण्यात आली होती. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली. 'बिहारमधील जनता आईच्या अपमानाचा बदला घेईल', असे मोदी म्हणाले. यानंतर एनडीएने बिहारमध्ये बंदची हाक देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin yojana : लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार? महत्वाची माहिती आली समोर, VIDEO

Thane : तोल गेला अन् तरुण ट्रेनमधून थेट विटावा खाडीत पडला, मुलुंड-कळवा दरम्यान घडला भयंकर प्रकार

Teachers Day 2025: शिक्षक दिन करा स्पेशल, तुमच्या शिक्षकांना अन् गुरुंना द्या 'या' खास शुभेच्छा

Sindhudurg Tourism : सिंधुदुर्गतील विरंगुळ्याचे ठिकाण, जोडीदारासोबत घालवा निवांत संध्याकाळ

पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल ३,९७६ जणांना नोटिसा, कारण काय? VIDEO

SCROLL FOR NEXT