Politics : मोठी राजकीय घडामोड! बड्या नेत्याने पक्षातून केली मुलीची हकालपट्टी

Politics News : तेलंगणाच्या माजी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मुलीला पक्षातून निलंबित केले आहे. पक्षाच्या विरोधात केलेल्या विधानांमुळे कारवाई करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
k kavitha suspended
k kavitha suspendedx
Published On
Summary
  • तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या मुलगी के. कविता यांना बीआरएस पक्षातून निलंबित केले.

  • पक्षाविरोधात केलेल्या विधानांमुळे आणि नेत्यांवर आरोप केल्यामुळे कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

  • निलंबनामुळे तेलंगणा राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Political News : राजकीय विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांची मुलगी कविता यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. मंगळवारी (२ ऑगस्ट) बीआरएस म्हणजेच भारत राष्ट्र समितीमधून के. कविता यांना निलंबित करण्यात आले आहे. पक्षाविरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे के. कविता यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

काही दिवसांपूर्वी कविता यांनी बीआरएस नेत्यांवर के. चंद्रशेखर राव यांची प्रतिमा मलिन करण्याचा आरोप केला होता. कविता यांचे सध्याचे वर्तन आणि त्यांच्याकडून होत असलेल्या कारवाया पक्षाची प्रतिमा मलिन करत असल्याचे बीआरएसचे मत आहे. यामुळे पक्षप्रमुख केसीआर यांनी कविता यांच्यावर तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचा निर्णय घेतला.

k kavitha suspended
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी महत्त्वाचं असणारं 'हैदराबाद गॅझेट' आहे काय?

कविता यांच्या परदेश दौऱ्यादरम्यानही बीआरएसकडून कारवाई करण्यात आली होती. यादरम्यान के. कविता यांना टीबीजीकेएस म्हणजेच तेलंगणा बोग्गु गनी कर्मिका संगमच्या अध्यक्षपदावरुन अचानक काढून टाकण्यात आले होते. त्यांच्यावर पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात कट रचल्याचा आरोप करण्यात आला होता. के. कविता यांना बीआरएसमधून निलंबित केल्याने तेलंगणा राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

k kavitha suspended
Manoj Jarange : ...तर विखेसाहेब तुमच्या घरातून जीव देईस्तोर उठणार नाही - मनोज जरांगे पाटील

पक्षाच्या कार्यालयात माझ्या माहितीशिवाय निवडणुका घेण्यात आल्या होत्या. हे कामगार कायद्यांचे उल्लंघन केल्यासारखे आहे, असे म्हणत के. कविता यांनी पक्षातील नेत्यांवर आरोप केले होते. पक्षाचे कामकाज कसे चालले आहे यावर मी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे माझ्याविरुद्ध द्वेष निर्माण झाला, असे वक्तव्य कविता यांनी केले आहे.

k kavitha suspended
Laxman Hake : शासनाला GR काढायचा अधिकार नाही, उपाययोजना ओबीसी आरक्षण संपवणारी; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com