Accident News Saam TV
देश विदेश

Accident News : गुळाची ढेप समजून महिलेने चक्क बॉम्ब फोडला अन्...; काळजाचा थरकाप उडवणारी घटना

सदर घटना घडल्यानंतर तेथील महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आहे.

Ruchika Jadhav

Bihar News : बिहारमधील बालादेवा गावातून एक घक्कादायक बातमी समोर आली आहे. गुळाची ढेप समजून या महिलेने चक्क बॉम्ब फोडलाय. मोठा स्पोट झाल्याने महिला यामध्ये भाजली आहे. सदर घटना घडल्यानंतर तेथील महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आहे. सध्या महिलेवर उपचार सुरू आहेत. (Blast)

सुरूवातीला महिलेला स्थानिक रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. त्यानंतर वाराणसी येथील मोठ्या हॉस्पीटलमध्ये महिलेला दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना पहाटे ४ च्या सुमारास घडली आहे. शांती देवी (वय 65) असं जखमी महिलेचे नाव आहे. पहाटेच्यावेळी घरात जेवण बनवताना ही घटना घडली.

पोलिसांनी या घटनेविषयी माहिती देताना म्हटलं आहे की, महिला पहाटे चार वाजता जेवण बनवत होती. त्यावेळी किचनमध्ये गुळाची एक मोठी ढेप तिला हवी होती. पहाटेच्या वेळी स्वयंपाक घरात फारसा उजेड नव्हता. मात्र महिला तशीच चाचपडत वस्तू शोधत होती. तितक्यात एका मोठ्या वस्तूवर तिचा हात पडला. तिला असे वाटले की ही वस्तू म्हणजे गुळाची ढेपच आहे.

गुळाची ढेप समजून या महिलेने त्या वस्तूवर जोरदार घाव घातला. दगडाने गुळ फोडून घ्यावा असा महिलेचा प्रयत्न होता. मात्र तो दगड नसून एक मोठा बॉम्ब होता. त्यामुळे यात ही महिला गंभीर जखमी झाली आहे. घटना घडल्यानंतर घरातील सर्वच व्यक्ती भयभीत झाले होते. पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर पोलिसांसह बॉम्ब शोधक पथक देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बराच शोध घेतला मात्र अद्याप कोणतेही स्फोटक या ठिकाणी मिळालेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: मुलीचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवला, संतापलेल्या बापाने तरुणाला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; दीड वर्षांनंतर...

MHADA: घराचं स्वप्न लांबणीवर! लॉटरीसाठी म्हाडाकडून नवा मुहूर्त; घरांसाठी कधी निघणार सोडत?

Maharashtra Live News Update: मुसळधार पावसामुळे बाणेरमध्ये वाहतूक ठप्प

Nandurbar : नंदुरबारच्या जिल्हाधिकारी महिलेचा प्रेरणादायी निर्णय; जुळ्या मुलांचं सरकारी शाळेत अ‍ॅडमिशन, VIDEO

Cardiac Arrest: कार्डियक अरेस्ट अन् हार्ट अटॅकमध्ये फरक; कोणती लक्षणे दिसतात?

SCROLL FOR NEXT