Pune Cyber Crime: धक्कादायक! पॉलिसी काढून देण्याच्या बहाण्याने महिलेची तब्बल ५५ लाखांची फसवणूक; सहा वर्ष सुरू होता प्रकार

Pune Fraud News: लाईफ पॉलिसी काढून त्याचावर मोठा फायदा काढून देऊ असे आश्वासन या सायबर चोरट्यांनी दिले होते.
Pune Cyber Crime
Pune Cyber CrimeSaam tv

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Cyber Crime News: पुणे शहरात ऑनलाईन फसवणूकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. असाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पॉलिसी काढून देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेची तब्बल ५५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. आता या संदर्भात महिलेने पोलिसांत धाव घेतली आहे. (Latest Marathi News)

Pune Cyber Crime
Pune Traffic Police: नियम मोडणाऱ्यांनो, सावधान! पुणे वाहतूक पोलीस ॲक्शन मोडवर; ७ दिवसांत ३०० वाहन परवाने रद्द

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही लाईफ पॉलिसी काढून देऊ तसेच त्याचावर मोठा फायदा काढून देऊ असे आश्वासन या सायबर चोरट्यांनी फिर्यादी महिलेला दिले होते. तसेच आम्ही बँकेचे लोकं आहोत हे अनेक वेळा सांगून त्यांनी या फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर बँकेत पैसे जमा करायला सांगितले.

चोरट्यांच्या या भुल थापांना बळी पडून या महिलेने पैसे जमा करण्यास सुरुवात केली. तसेच. वेळोवेळी काही रक्कम विविध ३६ बँकांमध्ये जमा केली. पैसे भरल्याची बनावट पावती देखील या सायबर चोरट्यांनी त्यांना दिली. हा सगळा प्रकार २०१४ ते २०१९ पर्यंत सुरू होता.

Pune Cyber Crime
Pune Accident News: २ वर्षीय बाळाला वाचवायला बापानं पाण्यात उडी घेतली, दोघांचाही करूण अंत; पुण्यातील दुर्दैवी घटना

पोलिसांत तक्रार दाखल...

मात्र, काही काळाने आपल्याला एक ही रुपया मिळत नसून आपली फसवणूक झाल्याचे या महिलेच्या लक्षात आले. ज्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेतली. प्राथमिक माहितीनुसार, या सात मोबाईल धारकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असले तरी सुद्धा या टोळीची ही खरे नावेन आहेत का याचा तपास सुरू आहे. (Pune News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com