जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या ट्रकवर हल्ला केला असून तीन जवान शहीद झाले आहेत. तर तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिलं आहे. हल्ला झालेल्या ठिकाणी अतिरिक्त कुमठ पाठवण्यात आली आहे. एका महिन्यातील लष्करावर झालेला हा दुसरा मोठा हल्ला आहे. सध्या सैन्याचे जवान आणि आतंकवाद्यांमध्ये मोठी चकमक सुरू असल्याची माहिती आहे.
राजौरी सेक्टरमधील थानामंडी भागात बुधवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या संयुक्त मोहिमेला अधिक मजबूत करण्याचे काम सुरू असताना दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. ४८ राष्ट्रीय रायफल सेक्टरमध्ये सैन्याची कारनाई सुरू असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. या भागात दहशतवादी आधीच दबा धरून बसले होते. सैन्याचा ट्रक या भागात दाखल झाल्यानंत दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. यात तीन जवान शहीद झाले आहेत तर तीन गंभीर जखमी झाले आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या भागात बुधवारी रात्री सुरक्षादलांनी दहशतवाद्यांविरोधात घेराव आणि शोधमोहीम सुरू केली होती. त्यासाठी बफलियाज येथून सैनिकांना ट्रकमधून पोहोचवण्यात येत होते. दरम्यान हल्ल्यानंतर सुरक्षादलांशी संपर्क साधण्यात आला असून अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. सध्या सैन्याचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.