wife husband clash: बायकोनं भावाला किडनी केली दान, नवरा रूसला; २० वर्षांनी Whatsapp वर पाठवला तलाक

Uttar Pradesh wife husband clash: उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यातून तीन तलाकचं अजब प्रकरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेशात लग्नाच्या २० वर्षानंतर नवऱ्याने बायकोला व्हाट्सअॅपवरून तीन तलाक दिल्याची घटना घडली आहे.
wife husband clash
wife husband clashSaam tv
Published On

UP Gonda latest News:

उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यातून तीन तलाकचं अजब प्रकरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेशात लग्नाच्या २० वर्षानंतर नवऱ्याने बायकोला व्हाट्सअॅपवरून तीन तलाक दिल्याची घटना घडली आहे. या व्यक्तीच्या बायकोने तिच्या भावाचा जीव वाचविण्यासाठी किडनी दान केली होती. बायकोच्या कृत्याने नवऱ्याने नाराज होऊन तीन तलाक दिल्याचा प्रकार घडला आहे. (Latest Marathi News)

महिलेची पोलिसांत धाव

बायकोने आजारी भावाला किडनी दान केल्यानंतर नवरा रुसला. या महिलेच्या सऊदी देशात काम करणाऱ्या नवऱ्याने थेट व्हाट्सअपवरुन तीन तलाक दिला. नवऱ्याने तलाक दिल्यानंतर पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली. या महिलेने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करत न्यायाची अपेक्षा व्यक्त केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

wife husband clash
Gujarat News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला भररस्त्यात मारहाण; नेमकी चूक कुणाची? पाहा VIDEO

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशच्या धानेपूर ठाणे पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. तरन्नुम यांचा विवाह २० वर्षापूर्वी जैतपूर येथे राहणाऱ्या अब्दुल रशीद उर्फ़ मोहम्मद राशिद यांच्याशी झाला होता.

लग्नानंतर अपत्य न झाल्याने पत्नी तरन्नुम यांच्या सहमतीने अब्दुल यांनी दुसरा विवाह केला होता. यानंतर अब्दुल नोकरीसाठी सऊदीत गेला होता. यादरम्यान, तरन्नुमच्या भावाची प्रकृती बिघडली. डॉक्टरांनी भावाच्या दोन्ही किडन्या खराब झाल्याचं सांगितलं होतं. यावेळी तरन्नुम यांनी भावाला किडनी दान केली. तरन्नुम यांनी किडनी दान करून भावाचा जीव वाचवला.

पोलिसांत तक्रार दाखल

तरन्नुम यांनी नवऱ्याला न विचारता भावाला किडनी दान केली होती. मात्र, बायकोने न विचारता किडनी दान केल्याने नवऱ्याने रागाच्या भरात मोबाईलवरूनच तीन तलाक दिला. नवऱ्याने तलाक दिल्यानंतर बायकोने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाची माहिती घेऊन तक्रार दाखल केली.

wife husband clash
Congress New Headquarters: काँग्रेसच्या मुख्यालयाचा पत्ता बदलणार, नव्या वर्षात इंदिरा भवनातून कामकाज

तरन्नुम यांनी सांगितलं की, पोलिसांनी सुरुवातीला तक्रार नोंदविण्यास नकार दिला. पोलिसांनी नवरा सऊदीवर आल्यानंतर वाद सोडवा असं सांगितलं. मात्र, त्यांनी तरन्नुम यांनी नवऱ्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com