Shetkari Karj Mafi 2024 Saam Tv
देश विदेश

Shetkari Karj Mafi 2024: शेतकऱ्यांना सर्वात मोठा दिलासा, कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांनी ३० सप्टेंबर २०२३ पर्यंतचे कर्ज ३१ मे २०२४ पर्यंत जमा केल्यास त्यावरील व्याज आणि दंड माफ करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी यांनी म्हटलं आहे.

Satish Daud

Farmer Loan Important Announcement

मी शेतकऱ्याचा मुलगा असून मलाही त्यांच्या वेदना समजतात. मी देखील स्वतः नांगरणी करून शेती केली आहे, असं म्हणत हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांनी ३० सप्टेंबर २०२३ पर्यंतचे कर्ज ३१ मे २०२४ पर्यंत जमा केल्यास त्यावरील व्याज आणि दंड माफ करण्यात येईल, असं मनोहर लाल यांनी म्हटलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हरियाणा विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी ही घोषणा केली आहे. मनोहर लाल यांच्या या घोषणेमुळे हरियाणातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) त्यांच्या दुसऱ्या टर्मचा अंतिम अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. (Latest Marathi News)

शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे कीटकनाशकाची फवारणी करता यावी यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या भारत सरकारच्या योजनेला राज्य सरकारचा देखील पाठींबा आहे, असं मनोहरलाल यांनी म्हटलं आहे. यासाठी राज्य सरकारकडून 'दृश्य' उपक्रमाद्वारे ५०० तरुण शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे औषध फवारणीचे प्रशिक्षण दिले जाईल, असंही मनोहर लाल यांनी स्पष्ट केलं आहे.

आतापर्यंत १०० शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणीचे प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांना प्रमाणपत्र देखील वाटप करण्यात आले आहेत, अशी माहिती देखील मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी विधानसभेत दिली. दरम्यान, राज्यातील ५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज आणि दंड माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

३० सप्टेंबर २०२३ पर्यंतचे कर्ज ३१ मे २०२४ पर्यंत कर्ज जमा करणाऱ्या शेतकऱ्यांचे व्याज आणि दंड माफ करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा असून मलाही शेतकऱ्याच्या वेदना समजतात. मी स्वतः नांगरणी करून शेती केल्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT