PM Narendra Modi: मनोहर जोशी यांच्या निधनावर PM मोदींनी व्यक्त केलं दु:ख; फोटो शेअर करत दिला आठवणींना उजाळा

PM Modi on Manohar Joshi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मनोहर जोशी यांच्यासोबतचा जुना फोटो ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
PM Modi Post on Manohar Joshi death
PM Modi Post on Manohar Joshi death Saam TV
Published On

PM Modi Post on Manohar Joshi death

लोकसभेचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळ हळहळलं आहे. राजकीय नेते ट्वीट करत जोशी यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मनोहर जोशी यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. मोदींनी जोशी यांच्यासोबतचा जुना फोटो ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. "मनोहर जोशी यांच्या निधनाने दुःख झाले. ते एक दिग्गज नेते होते ज्यांनी लोकसेवेत वर्षे घालवली आणि महापालिका, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या". (Latest Marathi News)

"महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम घेतले. केंद्रीय मंत्री म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. लोकसभा अध्यक्ष म्हणून आपल्या कार्यकाळात त्यांनी आपल्या संसदीय प्रक्रियेला अधिक गतिमान आणि सहभागी बनवण्याचा प्रयत्न केला".

"मनोहर जोशीजी यांना चारही विधीमंडळात काम करण्याचा बहुमान लाभलेला आहे. त्यांनी केलेले उल्लेखनीय कार्य नेहमी स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि समर्थकांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, ओम शांती. असं पंतप्रधान मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मनोहर जोशी यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करत भावुक पोस्ट केली आहे. "महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रचंड निष्ठा असलेले आणि त्यांना अपेक्षित महाराष्ट्र घडवण्यासाठी मनापासून योगदान देणारे एक शिस्तबध्द आणि खंबीर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले".

"महाराष्ट्र, मराठी माणसाविषयी त्यांना मनापासून आत्मीयता होती. महाराष्ट्राच्या राजकारणातला अभ्यासू आणि सुसंस्कृत चेहरा ही त्यांची ओळख. सर, अतिशय नम्र, संयमी, हजरजबाबी आणि शिस्तप्रिय होते. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील त्यांची कामगिरी, योगदान आमूलाग्र बदल घडवणारे होते. शिक्षण क्षेत्राविषयी त्यांना तळमळ होती. त्यामुळेच कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून त्यांनी तरुणांना शिक्षणाकडे वळवले".

"शिवसेना - भाजप युतीच्या सरकारचे नेतृत्व सरांनी केले. सर्वांना सोबत घेऊन, भूमिकांचा आदर करून वाटचाल करण्याचे कसब त्यांच्याकडे होते. मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशा विविध पदांवरील कामाचा त्यांना दांडगा अनुभव होता. शिवसेनेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मला लाभली, हे मी माझे भाग्य समजतो".

"आज आपण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला एक कडवट, सच्चा शिवसैनिक गमावला आहे. सरांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. जोशी कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत… भावपूर्ण श्रद्धांजली ! असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय".

PM Modi Post on Manohar Joshi death
Rajendra Patni Passed Away: भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन; वयाच्या ५९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com