PM Narendra Modi  saam tv
देश विदेश

मोठी घोषणा होणार? परदेश दौऱ्यावरून येताच PM मोदींनी बोलावली तातडीची बैठक, सर्व मंत्र्यांना दिल्ली न सोडण्याचे आदेश

PM Narendra Modi: देशातील इंधन टंचाईदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठई त्यांनी सर्व मंत्र्यांना दिल्ली न सोडण्याचे आदेश दिले आहेत.

Priya More
  • पीएम मोदींनी गुरुवारी तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावली

  • सर्व मंत्र्यांना दिल्ली न सोडण्याचे आदेश देण्यात आले

  • पीएम मोदी नुकतेच ५ देशांच्या दौऱ्यावरून भारतात आले

  • बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारासह महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता

भारतातील इंधन संकटादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी तातडीची बैठक बोलावली आहे. आज पीएम मोदी मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीला संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहे. या बैठकीसाठी पीएम मोदी यांनी सर्व मंत्र्यांना दिल्ली न सोडण्याचे आदेश दिले आहेत. नुकताच पीएम मोदी ५ देशांचा दौरा करून भारतात आले. या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारासह इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण अद्याप भाजपकडून बैठकीचा अजेंडा स्पष्ट केलेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी दिल्लीतील सेवा तीर्थ येथे मंत्र्यांसोबत एक महत्वाची बैठक बोलावली आहे. सरकारमध्ये सुरू असलेल्या राजकीय आणि आर्थिक चर्चेमुळे सर्व केंद्रीय मंत्र्यांना दिल्लीमध्ये थांबण्याचे निर्देश देण्यातआले आहेत. पीएम मोदी परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर लगेचच त्यांनी बैठक बोलावल्यामुळे चर्चा होत आहे. ते नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीला सर्व केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

या बैठकीमध्ये पश्चिम आशियायी देशांमध्ये सुरू असलेला संघर्ष आणि त्याचा भारतावर होणारा संभाव्य आर्थिक परिणाम यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. इंधनाच्या टंचाईनमुळे देशात पेट्रोल- डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशामध्ये वाढत्या प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार तेलाच्या किमती, इंधन पुरवठा साखळी आणि महागाई यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर सद्यस्थितीचा आढावा घेतील. या संकटावर लक्ष ठेवण्यासाठी आणि या कठीण काळातही भारताला मजबूत ठेवण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी सरकारने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांचा एक उच्चस्तरीय अनौपचारिक गट स्थापन केला आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह, निर्मला सीतारामन आणि हरदीप सिंग पुरी यांचा या गटामध्ये समावेश आहे. राजनाथ सिंह यांनी सांगितले की, सरकार २४ तास परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. कच्चे तेल, एलपीजी याचा आमच्याकडे अजूनही पुरेसा साठा आहे. कोणतीही मोठी समस्या नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टिटवाळा मांडा परिसरात अनधिकृत बांधकामाचा आरोप,प्रशासन कारवाई करत नसल्याचा जागामालकाचा दावा

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

महाराष्ट्रावर मोठं संकट येतंय! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना केलं अलर्ट

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! आंबा घाटात प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसला कारची धडक

SCROLL FOR NEXT