Shreya Maskar
सातारा जिल्ह्यात चंदन किल्ला वसलेला आहे. भुईंज परिसरातील बनावडी (इब्राहिमपूर) आणि बेलमाची गावांजवळ हे ऐतिहासिक ठिकाण वसलेले आहे.
सह्याद्री पर्वतरांगेत वसलेला चंदन किल्ला हा वंदन किल्ल्याचा जोड किल्ला आहे. हे जुळे किल्ले 'चंदन-वंदन' या नावाने प्रसिद्ध आहेत.
चंदन किल्ल्यावर पूर्वेकडून पश्चिमेकडे पसरलेले ३८ एकरांचे विस्तीर्ण त्रिकोणी आकाराचे पठार आहे.
ऐतिहासिक ताम्रपटांनुसार, चंदन किल्ला शिलाहार वंशातील राजा भोज (दुसरा) याने ११९१-११९२ या काळात बांधला होता.
चंदन किल्ला हा सातारा जिल्ह्यातील ३,८०० फूट उंचीवर असलेला एक ऐतिहासिक गिरीदुर्ग आहे. तुम्ही हिवाळ्यात आणि पावसाळ्यात येथे ट्रेकिंगचा प्लान करू शकता.
चंदन किल्ला १२ व्या शतकात बांधला असून १६७३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या आदिलशाहीकडून हा किल्ला जिंकून घेतला.
किल्ल्यावरून निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. येथे भगवान शंकराचे प्राचीन मंदिर आहे. येथे शांत वातावरण अनुभवता येते.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.