Pune Tourism : पुण्याचं विहंगम दृश्य पाहायचंय? मग 'हे' ठिकाण रिमझिम पावसात नक्की फिरा

Shreya Maskar

पुणे

पुण्यातील सर्वात उंच ठिकाण असलेली 'वेताळ टेकडी' हे ठिकाण पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर बनते. त्यामुळे तुम्ही येथे वीकेंडला ट्रिप प्लान करू शकता.

Pune | google

वेताळ टेकडी

पुण्यात कोथरूड येथे 'वेताळ टेकडी' हे ठिकाण आहे. टेकडीच्या माथ्यावर वेताळ बाबांचे मंदिर आहे. टेकडीच्या माथ्यावर श्री वेताळ बाबा महाराजांचे पवित्र मंदिर आहे, ज्यावरून या टेकडीला 'वेताळ टेकडी' हे नाव पडले आहे.

Vetal hill | google

फिटनेस

स्थानिक लोक येथे सकाळ-संध्याकाळ जॉगिंग, सायकलिंग आणि योगासनांसाठी येतात. येथून सूर्योदय आणि सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

Fitness | google

पक्षी निरीक्षण

'वेताळ टेकडी' हे ठिकाण पक्षी निरीक्षणासाठी बेस्ट लोकेशन आहे. तुम्ही येथे निसर्गाच्या सानिध्यात निवांत वेळ घालवू शकता. येथे २५० हून अधिक प्रजातींचे पक्षी पाहायला मिळतात.

Bird Watching | google

निसर्ग सौंदर्य

पावसाळ्यात निसर्गरम्य वाटा, धुक्याने वेढलेले टेकडीचे माथे आणि शहराची सुंदर दृश्ये अनुभवता येतात. टेकडीच्या उंच भागांवर थंड वारे वाहतात.

Natural Beauty | google

कसं जाल?

वेताळ टेकडी पुणे रेल्वे स्टेशनपासून साधारणपणे १० किमी अंतरावर आहे. त्यामुळे मुंबईहून तुम्ही पुण्याला ट्रेनने प्रवास करा. पुढे स्टेशनपासून रिक्षाने प्रवास करा.

how do you go | google

पुण्यातील पिकनिक स्पॉट्स

पवना तलाव, पानशेत धरण, मुळशी धरण, सारस बाग , सिंहगड किल्ला अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत.

Sinhagad | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : १८७५ पासून मुंबईची ओळख जपणारा 'हे' ठिकाण पाहिलं का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Mumbai Tourism | AI PHOTO
येथे क्लिक करा...