Shreya Maskar
मुंबईतील सर्वात जुने आणि सर्वात मोठे घाऊक माशांचे बाजार म्हणून सासून डॉक प्रसिद्ध आहे. वीकेंडला या ठिकाणी तुफान गर्दी पाहायला मिळते.
१८७५ मधील वसाहतकालीन इतिहास आणि आकर्षक सार्वजनिक भित्तिचित्रांसाठी प्रसिद्ध आहे.
दररोज पहाटे होणारा माशांचा घाऊक लिलाव आणि पापलेट व सुरमईसारख्या माशांची मोठी आवक येथे पाहायला मिळते.
१८७५ मध्ये अल्बर्ट अब्दुल्ला डेव्हिड सासून यांनी पश्चिम भारतातील पहिला 'वेट डॉक' (पाण्यातील गोदी) म्हणून याची निर्मिती केली.
'सेंट+आर्ट इंडिया फाउंडेशन'द्वारे साकारलेली रंगीबेरंगी आधुनिक कलाकृती आणि भिंतींवरील चित्रे येथे पाहायला मिळतात. तरूणाई येथे मोठ्या संख्येने येते. सार्वजनिक कला महोत्सवांदरम्यान आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक कलाकारांनी तयार केलेली मोठी, रंगीबेरंगी चित्रे पाहायला मिळतात.
मुंबईच्या मूळ कोळी मच्छीमार समाजाच्या दैनंदिन जीवनाचे आणि व्यापाराचे केंद्र आहे. तुम्हाला यांचे जीवन खूप जवळून येथे पाहता येते.
ससून डॉक अस्सल सांस्कृतिक अनुभव देतो, ज्यात ससून डॉक फिश मार्केट, आकर्षक स्ट्रीट आर्ट म्युरल्स आणि १८७५ सालची ऐतिहासिक वसाहतकालीन वास्तुकला यांचा समावेश आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.