Akola Fort : अकोल्याच्या इतिहासाची साक्ष देतोय 'हा' किल्ला, सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलंय सुंदर ठिकाण

Shreya Maskar

अकोला

नरनाळा किल्ला हा 'शाहनूर किल्ला' म्हणूनही ओळखला जातो. महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात हा किल्ला आहे.

Akola | google

नरनाळा किल्ला

नरनाळा किल्ला हा तीन लहान किल्ल्यांचा समूह आहे. यात जाफराबाद, नरनाळा आणि तेलियागड यांचा समावेश आहे.

Narnala Fort | google

ट्रेकिंगचा थरार

सातपुडा पर्वतरांगांमधून नरनाळा किल्ल्याचा ट्रेक केला जातो. पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी हे सुरक्षित ठिकाण आहे.

trekking | pinterest

ऐतिहासिक ठिकाण

नरनाळा किल्ल्यावर ऐतिहासिक 'कडक बिजली' तोफ आहे. गडाचे संरक्षण मजबूत करण्यासाठी आणि शत्रूवर दूरवर प्रभावी मारा करण्यासाठी याचा वापर केला गेला.

Historical place | google

किल्ल्याचा उद्देश

नरनाळा किल्ला हा सातपुडा पर्वतरांगेतील ३६२ एकर परिसरात पसरलेला एक प्राचीन गिरीदुर्ग आहे. हा किल्ला एक मोक्याचे लष्करी ठाणे आणि अनेक प्रमुख राजवटींचे प्रशासकीय केंद्र म्हणून कार्यरत होता.

The purpose of the fort | google

किल्ला कोणी बांधला?

नरनाळा किल्ला सर्वप्रथम १० व्या शतकात गोंड राजे 'नर्नाल सिंह' यांनी बांधला होता आणि नंतरच्या काळात बहमनी सल्तनत, मुघलांनी त्याचे पुनर्निर्माण व विस्तार केला.

Who built the fort? | google

कसं जाल?

अकोटपासून सुमारे १८ किमी आणि अकोला शहरापासून ७० किमी अंतरावर नरनाळा किल्ला वसलेला आहे. हा एक डोंगरावरील किल्ला आहे.

how do you go | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : रायगड किल्ल्याची 'ही' रहस्ये तुम्हाला माहीत आहेत का? वाचून व्हाल थक्क

Raigad Fort | AI PHOTO
येथे क्लिक करा...