

उजनी धरणातून सध्या १५ हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने भीमा (चंद्रभागा) नदीची पातळी वाढण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन यांनी वारकरी आणि भाविकांना रात्री तसेच पहाटे नदीपात्रात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
प्रक्षाळपूजेपर्यंत पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी राहणार असल्याने प्रशासनाने सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
माथेरान येथून नेरळला येणाऱ्या कारला माथेरानच्या घाट रस्त्यात अपघात झाला आहे. जुम्मापाट्टी येथील अवघड वळणावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्या लगत असलेल्या सुरक्षा कठड्यावर आदळली. हि कार सुरक्षा कठडा तोडून दरीतच्या बाजुला अधांतरी लटकली. सुदैवाने अपघातात चालक आणि चार प्रवासी असे पाच जण सुखरूप बचावले. किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांवर नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
दरड कोसळल्याने घाटातील संपूर्ण वाहतूक ठप्प सातारा महाबळेश्वर वाहतूक बंद...
दरड हटवण्यासाठी बोलावण्यात आलेल्या jcb मशीन वर पडली दरड...
ड्रायव्हर थोडक्यात बचावला...
कल्याण पूर्व येथील हनुमान नगर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्यावर दुचाकीने जात असताना साचलेल्या पाण्याचा शिडकावा एका तरुणाच्या अंगावर उडाल्याने दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रकरणी डोंबिवली येथील मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे पुढील तपास सुरू आहे
कसारा घाटातील बोगद्यात वंदे भारत एक्सप्रेस सुमारे एक तास बंद पडल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. रेल्वे कर्मचाऱ्यांकडून कोणतीही स्पष्ट माहिती न मिळाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. बोगद्यात हवा कमी झाल्याने काही प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने इमर्जन्सी दरवाजे उघडण्यात आले. या घटनेवरून संतप्त प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावर टीका केली. दरम्यान, तांत्रिक बिघाड दूर झाल्यानंतर वंदे भारत एक्सप्रेस पुन्हा मार्गस्थ झाली.
पुण्यातील बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आदिनाथ सोसायटीमागील भिंतींवर भर पावसात सुरू असलेल्या रंगकामावरून शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी संताप व्यक्त केला. हा प्रकार म्हणजे पुणेकरांच्या कराच्या पैशाची उधळपट्टी असल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित अधिकारी, अभियंते आणि ठेकेदारांची चौकशी करून तातडीने कारवाई करावी, तसेच रंगकाम त्वरित थांबवावे, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
महाड शहरात एका रात्रीत चार ठिकाणी घरफोड्या झाल्या आहेत. नातेखिंड येथील रायगड सिटीमधील दोन फ्लॅट आणि प्रभात कॉलनीतील दोन बंद बंगले अशा चार ठिकाणी दारा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी चोरी केली. रायगड सिटी येथील दोन घरफोड्यांमध्ये 96 हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला असून या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर इतर दोन बंगल्यांचे मालक उपलब्ध न झाल्याने बंगल्यांमधील चोरीचा गुन्हा अद्याप दाखल झालेला नाही. सदर चोऱ्यांमध्ये चोरट्यांच्या हलचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्या आधारे पोलिस तपास करीत आहेत.
CJP ची नवी दिल्लीत पत्रकार परिषद
विद्यार्थ्यांवर कारवाई करु नका अशी मागणी - कपिल सिब्बल
विद्यार्थ्यांना उद्यापर्यंत सोडा अन्यथा... असा इशारा CJP ने दिला आहे.
भाजपाचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्यावर कारवाईची करत पक्षातून बडतर्फ करण्याची मागणी
माजी मंत्री डॉ विजयकुमार गावित आणि माजी खासदार हिना गावित यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी संताप
माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉ. हिनाताई गावित यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि अश्लील भाषा वापरल्याप्रकरणी भाजपचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
काही ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजप पदाधिकारी आणि जनतेमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
सातारा -
अहिरे गावात मध्यरात्री चोरीचा थरार; सहा चोरट्यांचा धुमाकूळ CCTV मध्ये कैद
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील अहिरे गावात मध्यरात्री सहा चोरट्यांनी रस्त्याच्या कडेला असलेले दुकान फोडण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली.
चोरीच्या प्रयत्नादरम्यान एका दुकानदाराला शस्त्राचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाईल आणि घड्याळ घेऊन चोरट्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली एसटी डेपोतील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
महिला विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर संतप्त नागरिक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी थेट आगार प्रमुखांच्या केबिनमध्ये घुसून जोरदार घेराव घातला.
यावेळी केबिनमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अधिकाऱ्यांना धारेवर धरत संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करत, मागण्या मान्य न झाल्यास दापोली एसटी डेपोला टाळे ठोकून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. या घटनेने दापोलीत मोठी खळबळ उडाली आहे.
अहिल्यानगर -
साईंच्या चरणी भाविक आपल्या भक्तीभावातून विविध स्वरूपातील दान अर्पण करत असतात
अशाच एका अनोख्या आणि भावपूर्ण देणगीतून कर्नाटकातील उडपी येथील साईभक्तांनी साईबाबांप्रती असलेली निस्सीम श्रद्धा व्यक्त केली आहे.
तब्बल एक किलो 204 ग्रॅम वजनाची, साईबाबा महाप्रसाद तयार करतानाची प्रतिमात्मक चांदीची मूर्ती आज साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात आली.
सुमारे 2 लाख 14 हजार रुपये किमतीच्या या आकर्षक चांदीच्या मूर्तीने साई मंदिर परिसरात भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
देणगी स्वीकारल्यानंतर साईबाबा संस्थानच्या वतीने देणगीदार साईभक्तांचा सत्कार करण्यात आला..
धाराशिव -
शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या खासदार ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
उद्धव ठाकरेंना एक्स पोस्ट करून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
महिनाभरापूर्वीच ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश
पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी केली होती ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका
ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
-अलिबाग पोलिसांची मोठी कारवाई
- चार कोटी रूपये किंमतीची व्हेल माशाची उलटी जप्त
- एक आरोपी पोलीसांच्या ताब्यात
अक्कलपाडा धरणातून पाण्याचा विसर्ग
पांझरा नदीकाठच्या गावांसह धुळेकरांना सतर्कतेचा इशारा
अक्कलपाडा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू
अक्कलपाडा धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे
महाराष्ट्रातील एपीएसी पेपर फुटीची जबाबदारी निश्चित केली जाणार
महाराष्ट्रात कोणतीच पेपर फुटी खपवून घेतली जाणार नाही,कारवाई करण्यास देवेंद्र फडणवीस सक्षम
एमपीएससी पेपर फुटीवर कारवाई बाबत मंत्री जयकुमार गोरे यांचं वक्तव्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच नेतृत्व मजबूत,नेतृत्व बदलाचा कोणताही विषय व चर्चा नाही
महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नेतृत्वात पुढे जाईल
जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री बदलाची चर्चा फेटाळली
चाकण औद्योगिक क्षेत्रातील खराबवाडी येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमणावर प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ३७३ अनधिकृत व्यावसायिक मिळकतींवर बुलडोझर चालविण्यात येत आहे.
अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ आज लातूर शहरात भव्य महामोर्चाच आयोजन करण्यात आल. या मोर्चामध्ये जिल्ह्यासह विविध भागांतून आलेल्या हजारो बांधवांनी मोठा सहभाग नोंदवला.
तर या मोर्चादरम्यान उपवर्गीकरणाची अंमलबजावणी अ ब कड वर्गीकरण तातडीने करावी, अशी तीव्र मागणी मोर्चेकरांनी केली. शहरातील अण्णाभाऊ साठे चौकापासून जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला , दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.
अमरावतीच्या मेळघाटातील ४ शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आली,त्यामुळं मेळघाट पुन्हा एकदा हादरलं. विद्यार्थ्यांना भोजन देणाऱ्या सेंट्रल किचनच्या मालका विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. यानंतर आता थेट आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे...
मध्यवर्ती भागांसह उपनगरात मुसळधार पाऊस
सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात
घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी
पुणे शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे
महात्मा गांधींच्या पुतळ्याला करणार अभिवादन
- 28 आणि 29 जुलैला पूर्व विदर्भात मध्यम ते मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा
- उद्यापासून नागपुर गडचिरोली, गोंदिया,चंद्रपूर,भंडारा जिल्ह्याना पावसाचा ऑरेंज अलर्ट, मुसळधार पावसाचा अंदाज आहे...
- गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक 38 टक्के पावसाची तूट, त्याखालोखाल वाशीम 35,चंद्रपूर 31 टक्के तूट
- एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचा खंड, मराठवड्यातही पाऊस कमी पडण्याचा हवामान विभागाचा अनुमान आहे..
जालन्यातील 40 स्वयंचलित हवामान केंद्रांमधील उपकरणांशी छेडछाड झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील स्वयंचलित हवामान केंद्रांमधील पर्जन्यमापक यंत्रांच्या रिंग तोडणे, पर्जन्यमापक यंत्रांवर बर्फाचे तुकडे ठेवल्याचं समोर आल आहे.
संसदेच्या मान्सून अधिवेशनात विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीचार्जच्या मुद्द्यांवरून विरोधकांनी घातलेल्या जोरदार गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज विस्कळीत झाले. राज्यसभेचे कामकाज दुपारी ३:०० वाजेपर्यंत, तर लोकसभेचे कामकाज सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
विवाहाचे वाढते वय, स्थळ जुळण्यात होणारा विलंब आणि त्यातून निर्माण होणारा मानसिक ताण ही आता केवळ वैयक्तिक समस्या राहिलेली नसून गंभीर सामाजिक चिंतेची बाब बनत असल्याचे चित्र जळगाव जिल्ह्यातील आत्महत्यांच्या आकडेवारीतून समोर आले आहे. जळगाव पोलीस दलाच्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी ते ३० जून २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीत लग्न जमत नसल्याच्या नैराश्यातून तब्बल २९ तरुणांनी आत्महत्या केली आहे.
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात पावसाच्या तडाख्यामुळे रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग ५३ ला जोडणाऱ्या सालेभाटा ते परसोडी दरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे आणि भगदाड पडल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. रस्त्याच्या या खराब परिस्थितीमुळे एसटी महामंडळाने तुमसर-पालांदूर ही महत्त्वाची बस सेवा तात्पुरती बंद केली आहे, ज्यामुळे परिसरातील २० हून अधिक गावांतील नागरिक, रुग्ण आणि विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील सावर्डे-डेरवण फाटा येथे दुचाकी आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार शंकर पाटील, जे सावर्डा भुवडवाडी जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत, ते गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
- पुलावरील सिमेंटचा थर निघून लोखंडी सळाखी उघड्या पडल्या आहेत.
- मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी निकृष्ट दर्जाच्या कामाचा आरोप केला. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केले.
- २४ तास वर्दळ असलेल्या या पुलावर मोठा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला होता.
- रात्रीच्या वेळी वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्मना झाले होते... तातडीने संपूर्ण पुलाची तांत्रिक तपासणी करत दुरुस्तीचे कामाला सुरुवात झालीय..
कल्याण-माळशेज घाट राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ मौजे करंजाळे गावाच्या ठिकाणी रस्ता खचल्यामुळे माळशेजघाट मार्गे अहिल्यानगर तसेच पुणे येथून मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली आहे.
पुणे सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जीवनदायी ठरलेलं उजनी धरण आज अखेर 94 टक्के क्षमतेने भरलं असल्याने सोलापूरकरांची चिंता मिटली आहे. सध्या उजनी धरणात एकूण साठवण क्षमतेच्या 114 टीएमसी हून अधिक पाणीसाठा झालाय.
धारणी पोलीस स्टेशनमध्ये सेंट्रल किचनच्या मालकासह सहा जनावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल
रिसॉर्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांच्यामार्फत सेंट्रल किचनद्वारे विद्यार्थ्यांना भोजनपुरवठा केला जातो..
रिसॉर्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, संचालकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल
रिसॉर्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मालक विजय बोथरे, कुणाल उडाने आणि स्थानिक टेंभली येथील भोजन देणारे सचिन सातपुते, कूक संदीप सिंग, महेश देसाई आणि ओमकार यांच्यावर गुन्हे दाखल..
राज्यसभेचे कामकाज पुन्हा सुरू होताच काँग्रेस खासदारांनी विद्यार्थी आंदोलनावरील लाठीचार्जचा मुद्दा उपस्थित केला. काँग्रेसचे उपनेते प्रमोद तिवारी यांनी हा मुद्दा उपस्थित करून गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे जबाबदारीची मागणी केली. विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
28 ते 30 जुलै दरम्यान साजरा होणार गुरुपौर्णिमा उत्सव...
उत्सवाच्या मुख्य दिवशी, 29 जुलै रोजी साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार...
तीन दिवसीय उत्सव काळात लाखो भाविक घेणार साई समाधीचे दर्शन...
देशभरातून 45 ते 50 पायी पालख्या होणार साई नगरीत दाखल...
लोकसभेत परीक्षा दुरूस्ती विधेयक मांडलं
केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी विधेयक केलं सादर
देशभरात गाजलेले नीट पेपरफुटी प्रकरण ताजे असतानाच आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक भरती परीक्षेच्या पेपरबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत दोन उमेदवारांनी पुराव्यांसह महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
या संपूर्ण भरती प्रक्रियेची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यावर पुन्हा एकदा भीषण पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे. पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही जिल्ह्यातील तीन मोठे, सात मध्यम आणि ४१ लघु प्रकल्पांमध्ये मिळून केवळ 26 टक्के जलसाठा शिल्लक आहे. समाधानकारक पाऊस न झाल्याने आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
संसदेची दोन्ही सभागृहे दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब केल्यानंतर, विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसद परिसरात निदर्शने केली. त्यांनी मतचोरीपासून ते निधीचोरीपर्यंतच्या घोषणा लिहिलेले मोठे फलक हातात धरले होते.
राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित केला. पेपरफुटीवरून झालेल्या गदारोळामुळे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी दुपारी १२ वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब केलं.
गुजरातमधील एका व्यापाऱ्याला "रॉ" एजंट असल्याची बतावणी करून लाखो रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. धान्य व्यापाऱ्याचे बँक खाते ऑनलाइन व्यवहारातून गोठवण्यात आल्यानंतर ते पुन्हा सुरू करून देण्याच्या नावाखाली पैसे उकळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
बिहारमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर AK-47 मधून गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. शेकडो विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर एफआयआरही दाखल करण्यात आले आहेत.
राहुल गांधी यांची ट्विटमधून माहिती
धमेंद्र प्रधान संसदेत येताच विरोधकांची घोषणाबाजी
संसद परिसरात विरोधक आक्रामक
मी गोकुळ दूध संघाची निवडणूक लढवणार नाही
मंत्री हसन मुश्रीफ यांचं जाहीर कार्यक्रमात स्पष्टीकरण
मंत्री हसन मुश्रीफ हे स्वतः गोकुळ दूध संघाची निवडणूक लढवणार असल्याची गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात सुरू होती चर्चा
नाशिकच्या पूर्व भागात होत असलेल्या पावसामुळे अनेक धरण भरून वाहत असल्याने गोदावरी नदीतून पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने सकाळी 9 वाजता नांदूर-माध्यमेश्वर धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असून धरणातून सध्या 46227 क्यूसेस वेगाने पाणी गोदावरी नदी पत्रातून जायकवडीच्या दिशेने जात आहे,पाण्याचा धरणात येवा पाहता विसर्ग टप्प्या टप्प्याने वाढवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केलय.
बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक सिंदखेडराजा येथील तालुका क्रीडा संकुलाची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. खेळाडू घडविण्यासाठी उभारलेले क्रीडा संकुल आज दारूच्या अड्ड्यात रूपांतरित झाल्याचे चित्र असून, परिसरात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडलेला आहे. इमारत कायम कुलूपबंद असून क्रीडा साहित्य आणि मूलभूत सुविधांचा अभाव आहे. लाखो रुपये देखभाल खर्च होत असताना क्रीडा संकुलाची ही अवस्था कशी, असा सवाल उपस्थित होत आहे. राज्याचे क्रीडा मंत्री, जिल्हाधिकारी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी तातडीने पाहणी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे...
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील चार आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी यांनी दिलेली आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांनी रुग्णालयात गर्दी करू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये अशा पद्धतीच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना उपचारासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा देखील कामी लागली असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी दिली आहे.
नाशिकच्या मालेगाव मध्ये काल 3 तास आत्महत्येच नाट्य रंगल्याचे पहावयास मिळते,कौटुंबिक वादातून त्रस्त होत तो गिरणा नदी पात्रातील कोल्हापूर टाईप बंधाऱ्यावर मधोमध जाऊन बसला,आधीच नदीला पूर आलेला असल्याने पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले मात्र आपल्या जवळ कोणी आले तर आपण नदी पत्रात उडी मारू अशी धमकी तो देत होता,अखेर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीने त्याला पकडत नदी पत्रातून तब्बल तीन तासाच्या नाट्या नंतर त्याला सुखरूप बाहेर काढले,रात्री उशिरा पर्यंत त्याची पोलीस चौकशी करत होते.
राज्यात एसआयआर मोहीम सुरू असल्याने राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध होणारी अंतिम मतदार यादी ४ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यास दिली स्थगिती
एसआयआर मोहिमेनंतर प्रसिद्ध होणारी विधानसभा मतदारसंघनिहाय यादी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तयार करण्यास राज्य निवडणूक आयोगास विनंती
जळगाव जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत समोर आलेली आत्महत्येची आकडेवारी सुन्न करणारी आहे. अवघ्या १८० दिवसांत ४४३ जणांनी आत्महत्या केलीय. यात तब्बल ३८३ (सुमारे ९० टक्के) पुरुष आहेत. जिल्ह्यात रोज सरासरी तिघांचा बळी जातो, त्यामागे व्यसनाधीनता व कर्जबाजारीपणा यांसारखी प्रमुख कारणे समोर आली आहेत.
मलकापूर औद्योगिक क्षेत्र परिसरात असलेल्या एक्वा डायनामिक ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संचालकांना अहिल्यानगर येथील डायनामिक फायनान्स कन्सल्टन्सी,अहिल्यानगर च्या प्रतिनिधींनी...आम्ही तुम्हाला पंधरा कोटींचं कर्ज मिळवून देतो. असं सांगून 45 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार एक्वा डायनामिक ग्रीन एनर्जी कंपनीच्या संचालकांनी 24 एप्रिल 26 व 20 जुलै 26 रोजी केली आहे. मात्र अद्याप यावर कुठलीही कारवाई झाली नसल्याचं कंपनीचे संचालक सांगत आहेत.
- कामासाठी माझे डोके खात रहा, म्हणजे कामे होत राहतील"; आमदारांना मुख्यमंत्री फडणवीसांचा मिश्कील सल्ला.
- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे आणि मोहन मते निधीसाठी सतत पाठपुरावा करतात; मुख्यमंत्र्यांचे कौतुक.
- मनपाच्या ५७९ कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण; मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सोहळा.
जळगाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ साठी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमधील पात्र शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाली आहे. जिल्ह्यातील एकूण ५३ हजार ८९६ पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
हिमायतनगर–भोकर राष्ट्रीय महामार्गावरील सोनारी फाटा येथे भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली.या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.हिमायतनगरकडून भोकरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने सोनारी फाटा येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली.
यवतमाळच्या पांढरकवडा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मोहदा येथील सराफा दुकानातून 97 लाखांचे दागिने चोरणाऱ्या टोळीतील यवतमाळ पोलिसांनी पुणे येथून दोघांना अटक केली असून चौघांचा मध्यप्रदेश,गुजरात आणि राजस्थानात या राज्यात शोध घेतल्या जात आहेत.विशाल कुंभार राहणार चाकण तर राजकुमार राठोड राहणार दौंड पुणे असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या ‘कॅटॅलिस्ट्स फॉर चेंज’ कार्यक्रमात माहिती
महिला सुरक्षा, सक्षमीकरण आणि समानता अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हास्तरावर १० कलमी राष्ट्रीय कृती आराखडा लागू करण्यात येणार
२४ ते २६ या तारखेदरम्यान या प्रशिक्षण शिबिरात देशातील २७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील वरिष्ट प्रशासकीय व पोलिस अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला
NEET परीक्षेतील गैरप्रकार आणि पेपर फुटीच्या वादावरून देशभरात विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन सुरू असतानाच, केंद्र सरकार सार्वजनिक परीक्षांमध्ये होणाऱ्या अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आज संसदेत सुधारित 'अँटी-पेपर लीक' विधेयक (Public Examinations Prevention of Unfair Means Amendment Bill) मांडणार आहे. या प्रस्तावित कायद्याअंतर्गत परीक्षांचे पेपर लीक करणे किंवा संघटित कॉपी संस्था चालवणाऱ्या दोषींना ५ ते १० वर्षांपर्यंतचा कारावास आणि ५० लाख रुपयांपासून ते १० कोटी रुपयांपर्यंतच्या मोठ्या दंडाची कठोर तरतूद करण्यात आली आहे. तसेच अशा प्रकरणांची जलद चौकशी करण्यासाठी विशेष कृती दल (STF) आणि विशेष जलद गती न्यायालये (Fast-Track Courts) स्थापन करून ३ महिन्यांत खटला पूर्ण करण्याचे उद्दिष्ट यात ठेवण्यात आले आहे, जेणेकरून स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता टिकून राहील आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचे संरक्षण होईल.
ठाण्यात आज पहाटे पासून पावसाने काही अंशी विश्रांती घेतली आहे. मागील 10 तासात 30 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच राहणार आहे
दक्षिण गडचिरोलीतील जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या आल्लापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून आता संताप व्यक्त होत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली.
- तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने दडी मारल्याने नागपुरात उकाडा वाढला.
- तापमान ३३ अंश सेल्सिअसवर पोहोचले असून ते सरासरीपेक्षा २.६ अंशांनी अधिक.
- वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांना प्रचंड उकाडया त्रास सहन करावा लागत आहे.
- कामठी तालुक्यातील आडका शिवारातील ढोऱ्या-पोऱ्या नाल्यात घडली घटना.
- आषाढी एकादशीनिमित्त शाळेला सुटी असल्याने तो मित्रांसोबत फिरण्यासाठी आडका येथे गेला होता.
- पोहण्यासाठी नाल्यात उतरल्यावर तो खोल पाण्यात गेल्याने बुडाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.