Laughter Chefs 3 Winner : 'लाफ्टर शेफ्स ३'चा ग्रँड फिनाले थाटात पार; कॉमेडी कुकिंग शोचा मास्टरशेफ कोण ठरला? चमचमत्या ट्रॉफीसोबत फोटो शेअर

Laughter Chefs 3 Grand Finale : कॉमेडी कुकिंग शो 'लाफ्टर शेफ्स ३' चा नुकताच ग्रँड फिनाले पार पडला आहे. कोणी उचलली ट्रॉफी जाणून घेऊयात.
Laughter Chefs 3 Grand Finale
Laughter Chefs 3 Winnersaam tv
Published On
Summary

'लाफ्टर शेफ्स ३'चा ग्रँड फिनाले थाटामाटात पार पडला

कॉमेडी कुकिंग शोच्या मास्टरशेफ जोडीचं होतंय कौतुक

'लाफ्टर शेफ्स ३' हा एक कॉमेडी कुकिंग शो आहे.

भारती सिंह होस्ट करत असलेला शो 'लाफ्टर शेफ्स ३' चा नुकताच ग्रँड फिनाले पार पडला आहे. हा एक कॉमेडी कुकिंग शो आहे. ज्याची तरूणाईमध्ये तुफान क्रेझ पाहायला मिळते. यात हसत, मस्ती करत पदार्थ बनवले जातात. ग्रँड फिनालेला रोहित शेट्टी आणि 'खतरो के खिलाडी'चे स्पर्धक आले होते, त्यामुळे ग्रँड फिनालेला आणखी चारचाँद लागले.

'लाफ्टर शेफ्स ३' ची विजेता जोडी अली गोनी-जन्नत जुबैर ठरली आहे. स्वयंपाकघरातील अलीचा आत्मविश्वास आणि जन्नतची शिकण्याची तयारी यामुळे त्यांची जोडी सुपरहिट ठरली. संपूर्ण सीझनभर या जोडीने आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना भरपूर हसवले आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून अनेक कलाकार , चाहते अली गोनी-जन्नत जुबैर यांना शुभेच्छा देत आहे. त्यांचे कौतुक करत आहे आणि प्रेमाचा वर्षाव करत आहे.

'फिल्मीबीट'च्या वृत्तानुसार,'लाफ्टर शेफ्स ३' चे विजेते अली गोनी-जन्नत जुबैरला कोणतीही रोख रक्कम बक्षीस म्हणून मिळाली नाही. विजेतेपदाचे बक्षीस म्हणून त्यांना 'रिअलमी १६' सिरीजचा स्मार्टफोन आणि शोच्या ब्रँड पार्टनर्सनी प्रायोजित केलेल्या अनेक भेटवस्तू देण्यात आल्या. बक्षिसाच्या या स्वरूपाबाबत निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

Laughter Chefs 3 Grand Finale
Indian idol 16 winner : 'इंडियन आयडॉल १६' ची ट्रॉफी कोणी जिंकली? ट्रॉफीसह मिळालं इतक्या लाखांचं बक्षीस

'लाफ्टर शेफ्स ३' चे कलाकार

'लाफ्टर शेफ्स ३'मध्ये टिव्हीचे प्रसिद्ध चेहरे पाहायला मिळाले. यात कृष्णा अभिषेक-कश्मीरा शाह, अली गोनी-जन्नत जुबैर, अंकिता लोखंडे-विकी जैन, तेजस्वी प्रकाश-अर्जुन बिजलानी, करण कुंद्रा-एल्विस यादव, निया शर्मा-सुदेश लहरी आणि समर्थ जुरेल-अभिषेक शर्मा या जोड्या पाहायला मिळाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com