Jannat Zubair And Elvish Yadav: सोशल मीडियावर कायम चर्चेत असणारा युट्युबर आणि ‘बिग बॉस ओटीटी’चा विजेता एल्विश यादव पुन्हा एकदा चर्चेचा आला आहे. एल्विशने नुकतेच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर अभिनेत्री जन्नत झुबैर सोबतचे काही रोमँटिक फोटो पोस्ट केले. या फोटोमध्ये जन्नत लाल रंगाच्या साडीत दिसत असून तिचा देखणा अंदाज चाहत्यांना भुरळ घालतो आहे. एल्विशने देखील सुंदर असा कुर्ता घालून तिच्यासोबत फोटोशूट केले आहे.
या पोस्टसाठी एल्विशने कॅप्शन दिले, “तेरे दिल पे हक मेरा है”. फोटोज अपलोड झाल्यानंतर काही मिनिटांतच त्यावर हजारो कमेंट्स आणि लाखो लाइक्सचा पाऊस पडला. चाहत्यांनी या जोडीचे भरभरून कौतुक केले. मात्र याचसोबत अनेकांनी प्रश्न विचारण्यासही सुरुवात केली की हे खरंच रिलेशनशिपमधले आहेत का? की फक्त एखाद्या म्युझिक व्हिडिओ किंवा नविन कामाचा भाग म्हणून हा शूट केला आहे.
फोटोंवरील प्रतिक्रिया बघता चाहत्यांमध्ये दोन गट स्पष्ट दिसतात. काहींना एल्विश-जान्नतची जोडी आवडली असून त्यांनी “मेड फॉर इच अदर” अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसरीकडे काहींनी “फैसूचं काय झालं?” असा सवाल उपस्थित केला. कारण, अभिनेत्री जन्नत झुबैरचे नाव पूर्वीपासूनच सोशल मीडिया इन्फ्लुएंसर फैसल शेख (Mr. Faisu) सोबत जोडले गेले आहे. दोघे अनेक प्रोजेक्ट्समध्ये एकत्र दिसले असल्याने त्यांच्या रिलेशनशिपबाबत चर्चा रंगल्या होत्या. पण, काही काळानंतर त्यांचे ब्रेकअप झाल्याचे समोर आले. त्यामुळे एल्विशसोबतचे हे नवे फोटो पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे.
दरम्यान, एल्विश यादव आणि जन्नत झुबैर या दोघांनीही त्यांच्या नातेसंबंधांबाबत अद्याप कोणताही अधिकृत खुलासा केलेला नाही. चाहत्यांना मात्र याची उत्सुकता लागली आहे. सोशल मीडियावर हे फोटो वेगाने व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.