Shruti Vilas Kadam
कॉमेडियन भारती सिंहला लाफ्टर शेफ्स 3 च्या सेटवर त्यांच्या सहकलाकारांनी अचानक सरप्राइज बेबी शॉवर देत आनंदित केले.
या खास सेलिब्रेशनमध्ये तेजस्वी प्रकाश, जन्नत जुबैर, जैस्मीन भसीन, अली गोनी, कृष्णा अभिषेक आणि इतर अनेक मित्र-कलाकार उत्साहात सहभागी झाले.
सेट पूर्णपणे ब्लू आणि पिंक बलूननी सजवला होता. तसेच एका मोठ्या बोर्डावर “We can bearly wait” असा गोंडस मॅसेज लिहिला होता.
भारतीला “Mom-to-Be” सॅश आणि टिआरा घातलं होतं, यामुळे तो क्षण अधिक सुंदर आणि भावनिक बनला.
पार्टीमध्ये एक खास केक कापला गेला. त्यावर “I vote girl” अशी गोड नोट लिहिलेली होती, ज्यातून सर्वांची मुलगी होण्याची उत्सुकता दिसून येत होती.
सेलिब्रेशनमध्ये जैस्मीन भसीन आणि अली गोनी यांनी “London Thumakda” गाण्यावर धमाल डान्स करत कार्यक्रमाला जोरदार रंगत आणली.
भारती सिंहने सांगितले की, त्यांना सर्वांनी कामासाठी बोलावले होते; पण सेटवर पोहोचताच हा सरप्राइज बेबी शॉवर पाहून त्या भावनिक झाल्या व त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.