Security forces have arrested Mohammad Yusuf Katari saam tv
देश विदेश

Pahalgam attack Case : पहलगाम हल्ल्याच्या ५ महिन्यांनी सुरक्षा दलांना मोठं यश, दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ कोण?

Security forces have arrested Mohammad Yusuf Katari : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पाच महिन्यांनंतर सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Nandkumar Joshi

  • पहलगाम हल्ल्यानंतर पाच महिन्यांनी सुरक्षा दलांना मोठं यश

  • काश्मीरच्या कुलगाममधील तरुणाला अटक

  • दहशतवाद्यांना लॉजिस्टिकल सपोर्ट पुरवल्याचा आरोप

  • युसूफला १४ दिवसांची पोलीस कोठडी, चौकशीत आणखी महत्वाची माहिती हाती लागणार

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाच महिन्यांनी सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आरोपीच्या बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद युसूफ कटारी असं अटक केलेल्या तरूणाचं नाव आहे. तो काश्मीरच्या कुलगाम येथील रहिवासी असल्याची माहिती उघड झाली आहे.

२६ वर्षीय युसूफनं दहशतवाद्यांना लॉजिस्टिकल सपोर्ट केल्याचा आरोप आहे. त्याच्या मदतीमुळेच बैसरन खोऱ्यात २६ निष्पाप पर्यटकांची दहशतवाद्यांनी निर्घृण हत्या केली होती. युसूफला अटक केल्यानंतर त्याला १४ दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.

सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात सामील असलेल्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. सुरक्षा दलांना ऑपरेशन महादेव अंतर्गत केलेल्या कारवाईत हे यश मिळाले आहे. २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर पाच महिन्यांनी सुरक्षा दलांनी युसूफला अटक करून दहशतवादाचं नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे.

दहशतवाद्यांना मदत पुरवायचा युसूफ

युसूफ हा काश्मीरचा राहणारा आहे. त्याला तिथली खडानखडा माहिती आहे. पहलगाम हल्ल्यासाठी त्यानं दहशतवाद्यांना लॉजिस्टिकल सपोर्ट केला होता. दहशतवाद्यांना त्यानं रस्ते सांगितले होते. त्यांना आश्रय देण्याबरोबरच शस्त्रे पुरवण्यासाठी मदत केली होती. त्यामुळे दहशतवाद्यांना बैसरन खोऱ्यात भ्याड हल्ला करता आला.

युसूफच्या अटकेनंतर त्याच्या चौकशीतून आणखी महत्वपूर्ण माहिती हाती लागू शकते. तो कोणकोणत्या दहशतवादी संघटनांना मदत पुरवत होता आणि ती कशाप्रकारे करत होता, हे सगळं चौकशीतून समोर येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांसाठी ऊस झाला गोड; प्रति क्विंटलमागे केली वाढ, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार 30,000,000,000 रुपयांचा अतिरिक्त लाभ?

Private Train: भारतातील पहिली खासगी ट्रेन! राजधानी, शताब्दी आणि वंदे भारत एक्स्प्रेसच्या तुलनेत तिकीटाचे दर किती?

Maharashtra Live News Update: संध्याकाळ सहावाजेपर्यंत आंदोलनस्थळ रिकामे करा; उच्च न्यायालयाचे आदेश

Satara News : सातारा डॉक्टर महिला मृत्यू प्रकरणात ट्विस्ट, पीडितेच्या हात आणि पत्रावरील हस्ताक्षर जुळत नाही? ठाकरे गटाचा मोठा दावा

'१ वाजता आली, चेहऱ्यावर चिंता अन्..' 'त्या' रात्री डॉक्टर तरूणीसोबत काय घडलं? हॉटेल मालकानं सर्वच सांगितलं

SCROLL FOR NEXT