दारूच्या अड्ड्यावर भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये लाथाबुक्क्यांनी मारहाण|VIDEO

BJP And Congress Workers Fight Inside Wine Bar In Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यातील झरीजामणी तालुक्यात मुकुटबन येथील वाईन बारमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान मारहाण झाली.

यवतमाळच्या झरीजामणी तालुक्यातील मुकुटबन येथील एका वाईन बारमध्ये राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. मारहाणीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. बारमध्ये दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला वाद झाला त्यानंतर त्याचे रूपांतर धक्काबुक्की आणि हाणामारीत झाले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन्ही गटांतील कार्यकर्ते एकमेकांना मारहाण करत असल्याचे दिसत आहे. या मारहाणी मागील नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात कोणतीही अधिकृत तक्रार देखील दाखल झाली नसली तरी, बारमधील राडा, आणि हाणामारी करणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांबाबत जोरदार चर्चा रंगल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप आणि कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com