Delhi Political News :  Saam tv
देश विदेश

Politics : माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकारणातून संन्यास

Delhi Political News : माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. बड्या नेत्याने राजकारणातून संन्यास घेतला आहे.

Vishal Gangurde

अवध ओझा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत घेतला राजकारणातून संन्यास

ओझा यांनी मानले केजरीवाल, सिसोदिया, संजय सिंह आणि मतदारांचे आभार

सोमनाथ भारती यांच्याकडून ओझांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली

प्रसिद्ध शिक्षक आणि मोटिवेशनल स्पीकर अवध ओझा यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. अवध ओझा यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान राजकारण एन्ट्री केली होती. त्यांनी आम आदमी पक्षाच्या तिकीटावर पटपडगंज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर तब्बल १० महिन्यांनी त्यांनी राकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. ओझा यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित ही घोषणा केली.

अवध ओझा यांनी राजीनामा दिल्यानंतर पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचं कौतुक केलं. अवध ओझा यांनी म्हटलं की, आदरणीय अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, संजयजी या सर्वांचा मी आभारी आहे. अरविंद हे मोठे नेते आहेत. पटपडगंज मतदारसंघातील लोकांचे आभार. मला त्यांनी खूप प्रेम दिलं. जय हिंद'.

आम आदमी पक्षाचे नेते, माजी आमदार सोमनाथ भारती यांनी अवध ओझा यांच्या राजीनाम्यावर भाष्य केलं. त्यांनी म्हटलं की, 'अवध ओझा यांचा व्यक्तिगतरित्या आदर करतो. परंतु राजकारण शॉर्टटर्म प्रोजेक्ट नाही. तुमच्या सारख्या व्यक्तीने राजकारणात पाऊल ठेवण्याआधी आणि आम आदमी पक्षात प्रवेश करण्याआधी विचार करणे गरजेचे होते'.

सोमनाथ भारती यांनी पुढे म्हटलं की, 'अनेक लोकांनी पटपडगंज विधानसभा मतदारसंघात मेहनत केली होती. त्यांना तिकीट देता आले असते. पक्षाने तुमच्यावर विश्वास ठेवून संधी दिली. पक्षाने निकालाचा विचार केला नाही. आम आदमी पक्ष भारताचं भविष्य आहे. या पक्षाला सर्व राज्यात यशस्वी करण्यासाठी कठोर परिश्रम केले पाहिजेत. भारतातील लोकसंख्येच्या ९० टक्क्यांहून अधिक लोकांच्या शिक्षण, आरोग्यसेवा आणि इतर मुलभूत गरजांविषयी कोणता पक्ष बोलतो? भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांची भाषणे ऐका. सर्वसामान्य लोकांच्या मूलभूत गरजांवर कोणीही बोलत नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ईडीकडून भोंदू अशोक खरातच्या प्रॉपर्टीची सखोल चौकशी सुरू

Accident : वऱ्हाडाची बस ट्रकला धडकली, ६ जणांचा जागीच मृत्यू; अनेकजण गंभीर, अपघाताचा व्हिडिओ समोर

Farmer Success Story: कांदा पिकावर रोटार मारलं, केली आल्याची शेती, बीडच्या शेतकरी भावांनी घेतलं २५ लाखाचं उत्पादन

MI vs RCB IPL 2026:मुंबई इंडियन्सची पराभवाची हॅट्रिक, मुंबईला घरच्या मैदानात RCBनं हरवलं!

करमाळ्यात मेंढपाळसहीत महिलेला मारहाण, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT