Bangaluru stampede  Saam tv
देश विदेश

Bangaluru Stampede : आई-वडील रॅलीत मुलीला शोधत राहिले, काही वेळाने मृत्यूची वार्ताच धडकली, कुटुंबावर कोसळलं आभाळाएवढं दु:ख

Bangaluru stampede update : बेंगळुरुतील चिन्नास्वामी स्डेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या चेंगराचेंगरीत एका १४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

आरसीबी जिंकल्यानंतर आयोजित केलेल्या विजयी रॅलीसाठी आई-वडिलांनी मुलीला सोबत आणलं. विजयी रॅली सुरु होण्याआधीच चेंगराचेंगरी झाली. गर्दी अनियंत्रित झाल्यानंतर चाहते एकमेकांना तुडवून सैरावैरा पळू लागले. याचवेळी रॅलीसाठी आलेल्या जोडप्याची मुलगी गर्दीत हरवली. त्यानंतर त्यांनी मुलीची शोधाशोध सुरु केली. काही वेळानंतर मुलीच्या मृत्यूची वार्ता धडकली. मुलीच्या मृ्त्यूने कुटुंबावर आभाळाएवढं दु:ख कोसळलं आहे.

मुलगी हरवल्यानंतर आईवडील मोबाईलमधील फोटो लोकांना दाखवून शोधू लागले. मोबाईल स्क्रिनवर मुलीचा फोटा होता. पिवळा रंगाचा ड्रेस, केसावर गजरा, कानात कर्णफुले, चेहऱ्यावर चमक मुलीच्या चेहऱ्यावर होती. याच मुलीचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला आहे. दिव्यांशी असे मृत पावलेल्या मुलीचे नाव आहे. आरसीबीच्या विजयी रॅलीदरम्यान दिव्यांशी बेपत्ता झाली होती.

आरसीबीच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर आयोजित रॅलीत लाखो लोक चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर जमा झाले होते. मात्र, विजयाच्या रॅलीत चेंगराचेंगरी होऊन अनेकांचे मृत्यू झाल्यानंतर या आनंदावर शोककळा पसरली. दिव्यांशी देखील स्टेडियमजवळ पोहोचली होती. विराट कोहलीची एक झलक पाहण्यासाठी हजारो लोक आले होते. त्याचपैकी एक दिव्यांशी होती. या गर्दीत दिव्याशीचा हात आई-वडिलाच्या हातातून निसटला.

स्टेडियमबाहेर ६ लाख लोकांची गर्दी जमली होती. खरंतर फक्त २ लाख लोकांची व्यवस्था करण्यात आली होती. पोलिसांची फौज तैनात असतानाही गर्दी अनियंत्रित झाली. स्टेडियमला अनेक गेट होते. परंतु एकाच गेटवर गर्दी अधिक होती. चाहत्यांचा स्टेडियममध्ये शिरण्याचा प्रयत्न होता. त्याचवेळी चेंगराचेंगरी घडली. त्याचवेळी दिव्यांशीचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli : कसोटीतून निवृत्ती का घेतली? विराट कोहलीनं विचित्र कारण सांगितलं, म्हणाला, जेव्हा ४ दिवसांत दाढी...

Maharashtra Live News Update : अमरावती जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस

Pune News : 'स्पा सेंटरमध्ये फक्त स्पा चालू ठेवा, अन्यथा...' पुणे पोलिसांचा मालकांना सज्जड दम

Vande Bharat : नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा मुहूर्त ठरला; कुठे कुठे थांबणार? तिकिट किती? जाणून घ्या सर्व माहिती

Dhule News : माजी सैनिक चंदू चव्हाणांना पालिका कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण, नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT