Rescue teams at the site in Bengaluru after a wall collapse near a hospital claimed multiple lives amid heavy rainfall. saam tv
देश विदेश

Bengaluru Rain: बेंगळूरूमध्ये पावसाचा हाहाकार; हॉस्पिटलजवळ भिंत कोसळली, ७ जणांचा मृत्यू

Bengaluru Rain Wall Collapsed: बेंगळूरूमध्ये मुसळधार पावसामुळे बोरिंग हॉस्पिटलच्या इमारतीच्या जवळील एक भिंत कोसळी. यात सात जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

Bharat Jadhav

  • बेंगळुरूमध्ये मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना

  • रुग्णालयाजवळील भिंत कोसळून ७ जणांचा मृत्यू

  • अनेक जण जखमी, काही जण अडकल्याची भीती

बेंगळुरूमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. कर्नाटकच्या राजधानीला पावसाने झोडपून काढलंय. या पावसामुळे बेंगळूरुमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. शिवाजीनगरमधील बोरिंग आणि लेडी कर्झन रुग्णालयांजवळील संरक्षक भिंत अचानक कोसळून रस्त्यावरील दुकानदार आणि वाटसरूंसह ७ जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही बरेच लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले असण्याची भीती आहे, ज्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

मुसळधार पावसामुळे दुर्घटना घडली

मिळालेल्या माहितीनुसार,सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला पाऊस सुमारे एक तासभर सुरू होता. यासोबतच सोसाट्याचा वारा, मेघगर्जना आणि गारपीटही होत होती. हवामानातील या अचानक बदलापासून वाचण्यासाठी, रस्त्याच्या कडेला असलेल्या लोकांनी आणि मुलांनी रुग्णालयाच्या परिसराजवळ आश्रय घेतला. दरम्यान, कंपाऊंडच्या भिंतीचा काही भाग कोसळला, ज्यामुळे तेथे उपस्थित असलेले लोक अडकले.

जखमींवर उपचार सुरू आहेत

या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात उपचार सुरू आहेत. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येत आहेत. या घटनेमुळे गोंधळ आणि दुःखाचे वातावरण निर्माण झाले असून, कुटुंबीयांना सांत्वन देणे अशक्य झाले आहे.

मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली

घटनेची माहिती मिळताच, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घटनास्थळी येऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी अधिकाऱ्यांकडून अपघाताची चौकशी केली. भिंत कोसळण्याबद्दल नाराजी व्यक्त करत जबाबदार असलेल्यांना फटकारले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनीही घटनास्थळी भेट देऊन मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jaipur Fire: फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; ७ जणांचा होरपळून मृत्यू

Health Care: रोज रात्री झोपण्याआधी जिरा पाणी प्यायल्याने शरिराला मिळतात हे ७ आरोग्यदायी फायदे

ITR Filing: वेळेआधी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे ३ मोठे फायदे, शेवटची तारीख कधी?

Crispy Dalwada Recipe: घरच्या घरी नाश्त्यासाठी झटपट बनवा खमंग आणि कुरकुरीत डालवडा, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: आरबीआयच्या नव्या योजनांमुळे रुपया स्थिर होणार? एसबीआय अहवालात मोठा दावा

SCROLL FOR NEXT