Bengaluru crime news  Saam tv
देश विदेश

ऑफिसमध्ये लाइट बंद करण्यावरून वाद पेटला; सहकारी कर्मचाऱ्याने डंबल फेकून मारला, ४१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Bengaluru crime news : ऑफिसमध्ये लाइट बंद करण्यावरून दोन कर्मचाऱ्यांमध्ये वाद पेटला. या वादात एकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

Vishal Gangurde

लाइट बंद करण्यावरून बेंगळुरूमध्ये दोन कर्मचाऱ्यांमध्ये वाद

वादात २४ वर्षीय कर्मचाऱ्याकडून भीमेश बाबू यांच्या डोक्यावर डंबलने हल्ला

भीषण हल्ल्यात भीमेश यांचा जागीच मृत्यू

पोलिसांनी हत्या प्रकरण नोंदवून पुढील तपास सुरु केलाय

बेंगळुरू येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. लाइट बंद करण्यावरून सुरु झालेल्या वादातून एकाची हत्या झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. भीमेश बाबू असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. डाटा डिजिटल बँकेच्या ऑफिसमध्ये रात्री १.३० वाजता ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहिनुसार, ही कंपनी दररोज फिल्म शुटिंगचे व्हिडिओ स्टोअर करते. या कंपनीच्या ऑफिसमध्ये रात्री ४१ वर्षीय भीमेश बाबू आणि २४ वर्षीय सोमला वामशी नावाचे कर्मचारी थांबले होते. रात्री दोघांमध्ये ऑफिसची लाइट बंद करण्यावरून वाद झाला. भीमेश यांना लाइटचा त्रास होता. त्यामुळे ते सहकारी सोमला यला लाइट बंद करण्यास सांगत होते. मात्र, या दोघांमध्ये यावरून कडाक्याचं भांडण झालं. या वादानंतर विजयवाडा येथील रहिवाशी सोमला याने रागाच्या भरात भीमेश यांच्या डोक्यावर डंबलने मारहाण केली.

सोमला याने केलल्या हल्ल्यात भीमेश यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर सोमला घाबरून पळून गेला. त्यानंतर तो सहकारी कर्मचारी गौरी प्रसाद याच्याजवळ पोहोचला. प्रसाद याने दुसऱ्या मित्राकडे मदत मागितली. त्यानंतर दोघे ऑफिसमध्ये पोहोचले. त्यावेळी भीमेश हे ऑफिसमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यानंतर त्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून घेतली.

रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्याने भीमेश यांना तपासलं. त्यावेळी भीमेश यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यानंतर आरोपीने गोविंदराज पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांना शरण गेला. पोलिसांनी या प्रकरणी सोमला याच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची पुढील तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री मैदानात

Mughal harem: मुघल हरममधून पळून जाणाऱ्या महिलांसोबत काय केलं जायचं?

घरी परतताना शिक्षकावर हल्ला, २ हल्लेखोरांनी डोक्यात गोळी घातली; पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

Kriti Sanon: तेरे इश्क में हर रंग लाल...; क्रिती सॅननचा रॉयल लूक व्हायरल, पाहा PHOTO

Global Realty Expo : महाराष्ट्राची माती अबुधाबीत चमकली, सकाळच्या ग्लोबल रिअल्टी एक्स्पोने इतिहास रचला

SCROLL FOR NEXT