SSC-HSC Exam Date : दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर; वाचा कोणता पेपर कधी? जाणून घ्या

SSC-HSC Exam Date update : दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. जाणून घ्या कोणता पेपर कधी? वाचा
SSC-HSC Exam
SSC-HSC ExamSaam tv
Published On
Summary

महाराष्ट्र बोर्डाकडून दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

बारावी परीक्षा 10 फेब्रुवारी, दहावी परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरु

प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षांचा तपशील जाहीर

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळकडून फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणार्‍या दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी रोजी सुरु होणार आहे.

शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे.

SSC-HSC Exam
Raj Thackeray : राज ठाकरे यांना अटक करा; कुणी केली मागणी? VIDEO

दोन्ही परीक्षांचे वेळापत्रक हे www.mahahsscbobard.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आला आहे. परीक्षेआधी माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरुपात देण्यात येणार आहे. शाळा आणि कॉलेजमधून देण्यात येणारेच वेळापत्रक अंतिम असणार आहे.

SSC-HSC Exam
Kalyan Dombivli : गोळीबाराचा वाद विरला? भाजप आमदार आणि महेश गायकवाड एकत्र, कल्याणसाठी शिंदे-भाजपचा फॉर्म्युला ठरला?

छापील वेळापत्रकारवरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी लागणार आहे. संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले, सोशल मीडिया किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले ग्राह्य धरण्यात येऊ नये,असे मंडळाच्या सचिवांनी स्पष्ट केलं आहे.

प्रात्यक्षिक परीक्षेचा तपशील :

बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान आयोजित केलाय.

दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी या कालावधीत होईल, अशी माहिती मंडळाने दिली.

SSC-HSC Exam
Farmer’s Daughter : शेतकरी बापाने आयुष्य संपवलं; लेकीचं पोलीस होण्याचं स्वप्न, महाराष्ट्र पोलीस मदतीला धावले

दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक

तपशील : परीक्षेचा कालावधी

बारावी : १० फेब्रुवारी ते १८ मार्च

दहावी : २० फेब्रुवारी ते १८ मार्च

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com