BANGLADESH VIOLENCE: NCP LEADER SHOT DEAD IN BROAD DAYLIGHT saam tv
देश विदेश

Crime News: दिवसाढवळ्या NCPच्या नेत्याची हत्या, सभेआधी केला गोळीबार; अज्ञात हल्लेखोरांचा बांगलादेशात कहर

NCP Leader Shot Dead in Broad Daylight: राष्ट्रवादी काँग्रेसचे खुलनाचे प्रमुख मोतालेब सिकदर यांची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या झालीय. बांगलादेशातील हिंसाचार तीव्र झाला आहे. सध्या सुरू असलेल्या अशांततेमुळे राजकीय तणाव वाढला आहे.

Bharat Jadhav

बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच आहे. शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येनंतर अज्ञात हल्लेखोरांनी नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टी (एनसीपी) चे खुलना प्रमुख मोतालेब सिकदर यांची गोळ्या घालून हत्या केलीय. सोनाडांगा परिसरात दिवसाढवळ्या सिकदरवर गोळीबार करण्यात आला. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना गंभीर अवस्थेत खुलना मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आले.

माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधातील आंदोलनानंतर राष्ट्रवादी नागरिक पक्षाची स्थापना करण्यात आली होती. या पक्षात हसीनाच्या विरोधात निदर्शने करणारे लोक समाविष्ट आहेत. ढाका विद्यापीठातील मोठ्या संख्येने विद्यार्थी या पक्षाशी संलग्न आहेत. बांगलादेशात हा पक्ष पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. हल्ला झाला तेव्हा मोतालेब सिकदर हे खुलनामध्ये पक्षासाठी विभागीय कामगार रॅली आयोजित करण्याचे काम करत होते.

त्याचवेळी त्यांच्यावर गोळीबार झाला, यात सिकदर यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूला गोळी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खुलना महानगर युनिटचे संघटक सैफ नवाज यांनी सांगितले की, सिकदर हे केंद्रीय संघटक होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगार शाखेचे, राष्ट्रीय श्रमिक शक्तीचे खुलना विभागीय संयोजक होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डॉक्टर की गुंड? उपचार घेणाऱ्या रुग्णाला डॉक्टरकडून मारझोड, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमधील धक्कादायक प्रकार

IAS Officers Transferred: ऐन निवडणुकीत राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या कोणाची कुठे झाली बदली?

Dombivali: डोंबिवलीतील फडके रोडवरील धक्कादायक घटना; टेरेसची भिंत कोसळली

मुंबईत वंचित-काँग्रेस साथ साथ? आघाडीच्या चर्चेसाठी संयुक्त समिती?

Maharashtra Live News Update: निलंगा नगरपालिकेत पराभव झालेल्या उमेदवारांने काढली, आभार रॅली, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT