Crime News: माजी पोलीस महानिरीक्षकानं स्वत:वर झाडली गोळी, १२ पानाच्या सुसाईड नोटमधून समोर आलं धक्कादायक कारण

Retired DGP Critical After Self-Inflicted Gunshot : पंजाबचे माजी डीजीपी अमर सिंग चहल यांनी स्वत: वर गोळी झाडत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. त्यांच्या पटियाला येथील निवासस्थानी आत्महत्येच्या प्रयत्न केला. दरम्यान त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला याचा खुलासा करणारी १२ पानांची सुसाईड नोट सापडलीय.
Retired DGP Critical After Self-Inflicted Gunshot
Former Punjab DGP Amar Singh Chahal, who is undergoing treatment after a suicide attempt in Patiala.saamtv
Published On
Summary
  • पंजाबचे माजी डीजीपी अमर सिंग चहल यांनी स्वतःवर गोळी झाडली

  • पटियालातील घरी घटना, प्रकृती गंभीर

  • घटनास्थळी १२ पानांची सुसाईड नोट सापडली

पंजाब पोलिसांचे माजी महानिरीक्षक अमर सिंग चहल हे पटियाला येथील त्यांच्या घरी गंभीर जखमी अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना तातडीने उपचारासाठी पटियाला येथील पार्क रुग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याची सांगितलीय. अमरसिंग चहल यांनी स्वतःवर गोळी झाडली, अशी माहिती कुटु्ंबियांनी दिलीय.

Retired DGP Critical After Self-Inflicted Gunshot
Shocking : ३ कोटींच्या इन्श्यूरन्ससाठी पोटची २ मुलं बनली हैवान; वडिलांनाच मारण्यासाठी सोडला विषारी साप अन्...

दरम्यान घटनास्थळावरून पोलिसांना १२ पानांची सुसाईड नोट सापडलीय. यात ऑनलाइन फसवणूक झाल्यामुळे ते आर्थिक अडचणीत आल्याची त्यांनी म्हटलंय. पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी केली जातेय. दरम्यान सर्व बाजूने या घटनेची तपासणी केली जाईल असं पोलिसांनी सांगितलंय.

Retired DGP Critical After Self-Inflicted Gunshot
Crime: भररस्त्यात रक्तरंजित थरार, गोळ्या झाडून तरुणाची हत्या; जालना हादरले

फॉरेंसिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केली आहेत. यासह कुटुंबियांतील सदस्यांचे जबाब नोंदवण्यात आलाय. दरम्यान अमर सिंग यांनी स्वत:वर गोळी का झाडली याचे कारण अद्याप कळू शकले नाहीये. तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेचे खरे कारण काय हे कळेल. पोलीस सध्या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.

Retired DGP Critical After Self-Inflicted Gunshot
Crime News: दिवसाढवळ्या NCPच्या नेत्याची हत्या, सभेआधी केला गोळीबार; अज्ञात हल्लेखोरांचा बांगलादेशात कहर

दरम्यान अमर सिंग चहल यांच्या कुटुंबियांनी तक्रार केली की ते एका ऑनलाइन फसवणुकीचा बळी ठरलेत. यात फसवणूक करणाऱ्यांनी त्यांच्याकडून ८ कोटी रुपये उकाळली आहेत. त्यांनी त्यांच्या १२ पानांच्या सुसाईड नोटमध्ये याचा उल्लेख केला आहे. त्यांनी पंजाब पोलिस महासंचालकांना (डीजीपी) संबोधित केले आणि या प्रकरणाकडे त्वरित लक्ष देण्याची विनंती केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com