Shocking : ३ कोटींच्या इन्श्यूरन्ससाठी पोटची २ मुलं बनली हैवान; वडिलांनाच मारण्यासाठी सोडला विषारी साप अन्...

Tamilnadu Crime News : तामिळनाडूमध्ये विम्याच्या पैशांसाठी दोन मुलांनी वडिलांची सर्पदंशाने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड. पोलिसांनी ६ जणांना अटक केली.
Shocking : ३ कोटींच्या इन्श्यूरन्ससाठी पोटची २ मुलं बनली हैवान; वडिलांनाच मारण्यासाठी सोडला विषारी साप अन्...
Tamilnadu Crime News Saam Tv
Published On
Summary
  • विम्याच्या पैशांसाठी वडिलांची सर्पदंशाने हत्या करण्याचा कट

  • मृत्यू अपघाती दाखवण्याचा प्रयत्न, मात्र पोलिस तपासात उघड

  • गणेशन यांच्या नावावर ११ विमा पॉलिसी, ३ कोटींची रक्कम

  • दोन मुलांसह सहा आरोपी अटकेत, पुढील तपास सुरू

तामिळनाडू मधून मानवतेला काळिमा फासणारी बातमी समोर आली आहे. दोन मुलांनी वडिलांचे विम्याचे पैसे मिळवण्यासाठी सर्प दंश करून हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ६ जणांना ताब्यात घेतले असून यामध्ये मृत व्यक्तीची दोन मुलं आणि त्यांच्या साथीदारांचा समावेश आहे. मृत व्यक्तीचे नाव गणेशन असे आहे. ते एका सरकारी शाळेत लॅब असिस्टंट म्हणून काम करायचे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेशन यांना २२ ऑक्टोबर रोजी त्यांच्या घरी साप चावल्यानंतर रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात दाखल होताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सुरुवातीला हा मृत्यू सामान्य सर्पदंश मानला जात होता. मात्र मृताच्या मुलांनी विमा कंपनीशी संपर्क साधून दाव्यांच्या प्रक्रियेची चौकशी केली तेव्हा पोलिसांना अधिक संशय आला. पोलिसांनी केलेल्या अधिकच्या तपासात धक्कादायक बाब समोर आली.

Shocking : ३ कोटींच्या इन्श्यूरन्ससाठी पोटची २ मुलं बनली हैवान; वडिलांनाच मारण्यासाठी सोडला विषारी साप अन्...
Shocking : पीजीमध्ये राहणारी तरुणी दारू पिऊन आली, घरमालकाने तिच्यासोबत केलं भयंकर कृत्य; पुण्यात खळबळ

तपासात असे दिसून आले की गणेशनने विविध विमा कंपन्यांकडून त्यांच्या नावावर ११ पॉलिसी घेतल्या होत्या, त्यापैकी चार जीवन विमा पॉलिसी होत्या ज्यांची एकूण विमा रक्कम अंदाजे ₹३ कोटी होती. ही रक्कम गणेशनच्या मुलांना मिळावी म्हणून त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्या हत्येचा कट रचला. मृत गणेशनच्या मुलांनी त्यांना सर्प दंश करण्यासाठी विषारी साप सोडला.

Shocking : ३ कोटींच्या इन्श्यूरन्ससाठी पोटची २ मुलं बनली हैवान; वडिलांनाच मारण्यासाठी सोडला विषारी साप अन्...
Mumbai : ठाण्याहून CSMT चा प्रवास सुसाट होणार, महत्त्वाचा उड्डाणपूल BMC बांधणार, वाचा कसा असेल नवा मार्ग

या विषारी सापाने दंश केल्याने गणेशनला विषबाधा झाली. गणेशनच्या मुलांनी त्यांना अपघाती सर्पदंश असल्याचे दाखवण्यासाठी रुग्णालयात नेण्याचे ठरवले. मात्र त्यातही त्यांनी सर्पदंश झाल्यांनतर तब्बल २ तास वाट बघून रुग्णालयात नेले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर गणेशन यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. हा सगळा प्रकार विम्याचे ३ कोटी मिळवण्यासाठी गणेशनच्या मुलांनी रचला. यामध्ये गणेशनच्या मुलांना आणखी ४ जणांनी सहकार्य केले. पोलिसांनी याप्रकरणी ६ जणांना अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com