Mohammed Yunus  Saam Tv
देश विदेश

Bangladesh News: मोठी बातमी! मोहम्मद युनूस बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख, आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी मान्य

Rohini Gudaghe

प्रमोद जगताप, साम टीव्ही नवी दिल्ली

बांगलादेशमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांची बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलीय. बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन यांच्या सचिवांनी मंगळवारी ६ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा माहिती दिलीय. संसद बरखास्त केल्यानंतर अध्यक्ष शहाबुद्दीन आणि विद्यार्थी नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला (Bangladesh President) होता.

मोहम्मद युनूस बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख

त्या बैठकीला तिन्ही सैन्य दलांचे प्रमुखही देखील उपस्थित होते. शेख हसीना या अजूनही भारतात असून त्यांना अद्यापपर्यंत (Bangladesh Parliament) कुठल्याच देशाने आश्रय दिला नसल्याची माहिती मिळत आहे. बांगलादेशात गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारचे नेतृत्व करण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे. आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थी नेत्यांसह तिन्ही सेना प्रमुखांनीही या बैठकीला हजेरी लावली होती.

आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी मान्य

बांगलादेशमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय गोंधळ सुरू आहे, त्यानंतर आता अखेर अंतरिम सरकार स्थापन होणार आहे. नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस (Mohammed Shahabuddin) यांची अंतरिम सरकारचे नेतृत्व करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. देशाचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रपती भवन येथे बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. आंदोलक विद्यार्थ्यांनी देखील मोहम्मद युनूस यांचा अंतरिम सरकारचे नेतृत्व करण्याचा प्रस्ताव मान्य केल्याचं समोर आलं आहे.

शेख हसीना यांचे विरोधक

मोहम्मद युनूस बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांचे कट्टर विरोधक असल्याची माहिती मिळतेय. शेख हसीना यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडला आहे. 'बँकर ऑफ द पुअर' अशी युनूस यांची ओळख आहे. त्यांनी ग्रामीण भागातील लाखो लोकांना रिबीतून बाहेर काढण्यास मदत केली होती. बांगलादेशमधील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी ढाकातील परिस्थिती शांत होती. लष्कर आणि पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर तैनात केलेला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT