बांगलादेशमध्ये (Bangladesh) हिंसाचाराचे सत्र सुरूच आहे. पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर शेख हसीना भारतामध्ये पळून गेल्या. त्या सध्या ब्रिटन किंवा फिनलँडमध्ये आश्रय घेण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या बांगलादेशची कमान लष्करकाच्या हाती असून अंतरिम सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशामध्येच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस हे अंतरिम सरकारचे प्रमुख असतील, असे जाहीर केले आहे. 'गरीबांचे बँकर' म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्याचसोबत विरोधी पक्षनेत्या बेगम खालिदा झिया यांची तुरूंगातून सुटका करण्याचे आदेश राष्ट्रपतींनी दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थी चळवळीचे नेते नाहीद इस्लाम, आसिफ मेहमूद, अबू बकर मजुमदार यांनी डॉ. युनूस यांच्या नावाची घोषणा केली आहे. या तिघांनी आज सकाळी एक व्हिडीओ जारी करत ८४ वर्षांचे डॉ. युनूस अंतरिम सरकारचा कार्यभार स्वीकारणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी देश सोडून पळून गेलेल्या शेख हसीना यांच्यावर डॉ. युनूस यांनी घणाघात केला. त्यांनी सांगितले की, आज देश स्वतंत्र झाला. शेख हसीना यांच्या कार्यकाळापर्यंत इथे लोकं गुलामासारखे जीवन जगत होते. शेख हसीना यांची वागणूक हुकूमशाहीसारखी होती. त्यांना संपूर्ण देशावर नियंत्रण ठेवायाचे होते. आज देशातील जनतेची खऱ्या अर्थाने सुटका झाल्यासारखे वाटत आहे.'
अवामी लीग सरकारच्या काळामध्ये डॉ. युनूस यांच्यावर १९० गुन्हे दाखल करण्यात आले होते. शेख हसीना यांनी त्यांचे वडील शेख मुजीबर रहमान यांचा वारसा नष्ट केल्याचे डॉ. युनूस यांनी सांगितले. बांगलादेशामध्ये सुरू असलेल्या अशांततेचेही त्यांनी समर्थन केले. त्यांनी पुढे सांगितले की, आज आंदोलनक आपला राग काढत आहेत. आज उपद्रव करणारे हेच विद्यार्थी आणि तरुण देशाला योग्य दिशेने घेऊन जातील अशी आशा आहे. शेख हसीना निवडणुकीमध्ये हेराफेरी करायच्या. त्यांनी अशी परिस्थिती निर्माण केली होती की त्यांना राजकीय प्रतिसाद देणे कठीण झाले आहे.
गरीब जनतेला बँकिंग सुविधा देण्याच्या युनूसच्या प्रयोगामुळे बांगलादेशला सूक्ष्म कर्जाचे केंद्र म्हणून ओळख मिळाली. युनूस सध्या देशाबाहेर आहेत. परंतु त्यांनी शेख हसीनांच्या हकालपट्टीचे स्वागत केले आणि या विकासाला देशाची 'दुसरी मुक्ती' असे म्हटले. ग्रामीण बँकेच्या माध्यमातून दारिद्र्य निर्मूलन मोहिमेसाठी युनूस यांना २००६ मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्याची पद्धत वेगवेगळ्या खंडात अवलंबली गेली.
युनूस आणि हसीना सरकारमध्ये अस्पष्ट कारणांमुळे बराच काळ वाद सुरू आहे. २००८ मध्ये हसीना सत्तेवर आल्यानंतर अधिकाऱ्यांनी युनूसविरुद्ध अनेक तपास सुरू केले. बांगलादेशी अधिकाऱ्यांनी २०११ मध्ये वैधानिक ग्रामीण बँकेच्या अॅक्टिव्हिटीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आणि सरकारी सेवानिवृत्ती नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून युनूस यांना संस्थापक व्यवस्थापकीय संचालक पदावरून काढून टाकले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.