Family members mourn the death of a Hindu youth amid rising communal violence in Bangladesh. Saam Tv
देश विदेश

बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार सुरूच, आणखी एका तरुणाला विष देऊन मारलं

Hindu Minority Attacks In Bangladesh After Sheikh Hasina: बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्यांकांवरील हल्ले वाढत असून सुनामगंज जिल्ह्यात एका हिंदू युवकाची विष देऊन निर्घृण हत्या करण्यात आली.

Omkar Sonawane

बांग्लादेशात हिंदू समुदायाला लक्ष्य करून होणाऱ्या हिंसाचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. आता मिळालेल्या माहितीनुसार सुनामगंज जिल्ह्यात जॉय महापात्रा नावाच्या हिंदू युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मृताच्या कुटुंबीयांनी आरोप केला की, स्थानिक व्यक्तीने जॉयला अमानुषपणे मारहाण केली आणि नंतर त्याला विष पाजले. गंभीर अवस्थेत जॉयला सिलहट येथील एमएजी उस्मानी मेडिकल कॉलेज रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

याआधी काही दिवसांपूर्वी २५ वर्षीय मिथुन सरकार याचा मृत्यू झाला होता. चोरीच्या संशयावरून जमावाने त्याचा पाठलाग केला. जमावापासून वाचण्यासाठी मिथुनने कालव्यात उडी घेतली मात्र त्यामध्ये बुडून त्याचा मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी त्याचा मृतदेह आढळून आला.

त्याआधी १८ डिसेंबर रोजी मैमनसिंह जिल्ह्यात २७ वर्षीय दीपु चंद्र दास याची मारहाण करून हत्या करण्यात आली होती. त्याच्यावर आरोप करण्यात आला होता. जमावाने आधी त्याला बेदम मारहाण केली आणि नंतर त्याचा मृतदेह झाडाला लटकवून पेटवून दिला. या प्रकरणातील मुख्य आरोपी यासीन अराफातला पोलिसांनी अटक केली आहे. तपासात समोर आले की दीपु चंद्र दास याच्यावर लावलेले आरोप पूर्णपणे खोटे असून ती केवळ अफवा होती.

अल्पसंख्यांकांवरील धोका वाढला

२०२४ मधील विद्रोहानंतर शेख हसीना सरकार कोसळल्यानंतर आणि आगामी संसदीय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बांग्लादेशात धार्मिक अल्पसंख्यांकांवरील हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बांग्लादेश हिंदू बुद्धिस्ट ख्रिश्चन युनिटी कौन्सिलच्या माहितीनुसार, केवळ डिसेंबर महिन्यात सांप्रदायिक हिंसाचाराच्या किमान ५१ घटना नोंदवण्यात आल्या आहेत.

यामध्ये १० हत्या, लूटमार व जाळपोळीच्या २३ घटना, दरोडे व चोरीचे १० प्रकार, खोट्या धार्मिक टीका टिप्पणीच्या आरोपाखाली अटक व छळाचे ४ प्रकार, बलात्काराच्या प्रयत्नाची एक घटना आणि मारहाणीच्या ३ घटनांचा समावेश आहे. याशिवाय अल्पसंख्यांकांचे घरे, मंदिरे आणि व्यवसायांनाही लक्ष्य करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tilgul Ladoo: मकर संक्रातीला बनवा मऊसूत गूळ-शेंगदाण्याचे लाडू, नोट करा सिंपल रेसिपी

Delhi High Court : लिव्ह-इन पार्टनर्सना पेन्शन मिळणार? उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश

Afternoon Sleeping Time: दुपारी कधीपण झोपू नका, 'ही' आहे योग्य वेळ

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचा मुंबईसाठी मास्टर प्लान! पायाभूत सुविधांचे नवे युग अन् मायानगरीचा महाकायापालट

Maharashtra Live News Update : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

SCROLL FOR NEXT