Winter Alert : कडाक्याची थंडी गायब, सकाळी हवेत गारवा तर दुपारी ऊन्हाचे चटके, वाचा आजचे हवामान

Mahrashtra Weather Update : गेले काही दिवस राज्यातील हवामानात सतत बदल होत आहे. आज ढगाळ वातावरणासह थंडीचा गारठा कमी राहणार असून उन्हाचा तडकाही नागरिकांना सहन करावा लागणार आहे.
Winter Alert : कडाक्याची थंडी गायब, सकाळी हवेत गारवा तर दुपारी ऊन्हाचे चटके, वाचा आजचे हवामान
Mahrashtra Weather UpdateSaam Tv
Published On
Summary
  • नववर्षाच्या पहिल्या दिवशी मुंबईसह राज्यात पावसाच्या सरी बरसल्या

  • ढगाळ हवामानामुळे किमान तापमान १०° पेक्षा जास्त, थंडी ओसरली

  • पहाटे धुके आणि दव पडण्याची स्थिती कायम

  • मुंबईत ३२°/१८°, पुण्यात ३१°/१४° तापमानाचा अंदाज

राज्यातील वातावरणात गेल्या काही दिवसांत बदल जाणवत असून नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईसह अनेक ठिकाणी पावसाच्या सरींनी हजेरी लावली. उत्तरेकडील थंड वाऱ्याचा अभाव आणि ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. राज्यात थंडी कमी झाली असून, पहाटे धुके आणि दव पडल्याचे दिसून येत आहे. आज राज्यात किमान तापमानातील चढ-उतार कायम राहून, ढगाळ हवामानासह कडाक्याच्या थंडीची शक्यता नसली तरी पहाटे आणि रात्री गारठा जाणवणार असल्याचा अंदाज आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. या ढगाळ हवामानाचा परिणाम किमान तापमानावर झाला असून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ नोंदवण्यात आली आहे.

Winter Alert : कडाक्याची थंडी गायब, सकाळी हवेत गारवा तर दुपारी ऊन्हाचे चटके, वाचा आजचे हवामान
Nanded : जिल्हा परिषदेच्या जेवणात आळ्या, मुलांनी कडिपत्त्यासारख्या काढल्या अन्... नांदेडच्या शाळेतील धक्कादायक प्रकार; VIDEO व्हायरल

किमान तापमानाचा पारा १० अंशांपार गेल्याने राज्यात थंडी ओसरली आहे. मात्र पहाटेच्या हवेत गारवा, ढगाळ हवामान, धुके आणि दव पडल्याची स्थिती कायम आहे. आज राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहून, ढगाळ हवामानासह थंडी कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Winter Alert : कडाक्याची थंडी गायब, सकाळी हवेत गारवा तर दुपारी ऊन्हाचे चटके, वाचा आजचे हवामान
Crime News : ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, पोलिसांनी केला दोघांचा एन्काउंटर, २४ तासाच्या आत ठोकल्या बेड्या

आजचे मुंबईतील कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात थंडीची तीव्रता काहीशी कमी झाली आहे. तर पुण्यात कमाल तापमान ३१ अंश, तर किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. सकाळच्या वेळेत धुक्याचं प्रमाण कायम असून वाहनचालकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. सोलापूरमध्ये राज्यातील उच्चांकी कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com