FORMER BANGLADESH PM SHEIKH HASINA SENTENCED TO PRISON saam tv
देश विदेश

Bangladesh Politics: माजी पंतप्रधान शेख हसीना यांना तुरुंगवासाची शिक्षा; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Sheikh Hasina Prison Sentence: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना न्यायालयाच्या अवमान प्रकरणात सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलीय. नेमकं प्रकरण काय आहे, याची माहिती जाणून घेऊ.

Bharat Jadhav

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बुधवारी मोठा धक्का बसलाय. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (ICT) न्यायालयाच्या अवमानाच्या प्रकरणात त्यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावलीय. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण-१ चे अध्यक्ष न्यायमूर्ती मोहम्मद गुलाम मुर्तुझा मोजुमदार यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिलाय.

त्याच निर्णयात, न्यायाधिकरणाने गायबंधा येथील गोविंदगंज येथील रहिवासी शकील अकंद बुलबुल यालाही दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलीय. दरम्यान असं घडण्याची ही पहिलीच वेळ आहे. शेख हसीना यांनी ११ महिन्यांपूर्वी पंतप्रधान पद सोडलं होतं. दरम्यान देश सोडून पळून गेल्यानंतर पदच्युत झालेल्या अवामी लीग नेत्याला एखाद्या प्रकरणात शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

यावर्षी जूनमध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणातील अभियोक्त्यांनी गेल्या वर्षीच्या मोठ्या निदर्शनांमध्ये हसीना यांच्यावर मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचा औपचारिक आरोप लावला. आयसीटीचे मुख्य अभियोक्ता मोहम्मद ताजुल इस्लाम यांनी हसीना यांच्यावर त्यांच्या सरकारविरुद्धच्या निदर्शनांवर पद्धतशीर हल्ला केल्याचा आरोप केलाय.

संयुक्त राष्ट्रांच्या अधिकार कार्यालयाच्या अहवालानुसार, मागील सरकारच्या पतनानंतर सुरू असलेल्या सूडाच्या हिंसाचारामुळे १५ जुलै ते १५ ऑगस्ट २०२४ दरम्यान १,४०० लोक मारले गेले. दरम्यान शेख हसीना यांनी हे सर्व आरोप फेटाळलेत. शेख हसीना यांचे वकील अमीर हुसेन यांच्या मते, त्यांनी पत्रकारांना सांगितले की, ते या आरोपांमधून तिला निर्दोष मुक्त करण्यासाठी युक्तिवाद करतील.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये बांगलादेशमध्ये हसीना सरकारविरुद्ध व्यापक निदर्शने झाली. त्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा देत भारतात यावे लागले. सध्या शेख हसीना दिल्लीतील एका सुरक्षित घरात राहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Watermelon Storage Tips: कापलेला कलिंगड फ्रिजमध्ये ठेवायचा की नाही? जाणून घ्या

Post Office Scheme : १ लाख गुंतवा अन् ₹४५,००० मिळवा व्याज; पोस्टाची भन्नाट योजना आताच करा नोट

Maharashtra News Live Update: सुनेत्रा पवारांकडून सभा स्थळाची पाहणी, बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता सभा

Crime News : तरुणाने लैंगिक अत्याचार केले, धर्मांतरासाठी दबाव टाकला; बीडमधील महिलेसोबत भयंकर घडलं

Trendy Blouse Designs: साडीवर लूक दिसेल अप्सरेसारखा! ऑफशोल्डर ते बॅकलेस ब्लाऊजचे हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT