Trump and Netanyahu: ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्या हत्येचा फतवा; इराणच्या मौलवीची धमकी

Trump and Netanyahu Threat: इराणमध्ये ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्याविरुद्ध हत्येचा फतवा जारी करण्यात आलाय. काय आहे इराणी मौलानाचा हत्येचा फतवा? फतव्यात नेमकं काय म्हटलयं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Trump and Netanyahu Threat
Iranian cleric Naser Makarem Shirazi calls for assassination of Trump and Netanyahu, urges worldwide Muslim unity
Published On

सुप्रिम मसकर

इराणमध्ये ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्याविरुद्ध हत्येचा फतवा जारी करण्यात आलाय. इराणी मौलवी नासेर मकरम शिराजी यांनी जगभरातील मुस्लिमांना एकत्र येण्याचे आवाहन केलंय. जागतिक इस्लामिक समुदायाच्या नेतृत्वाला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा सरकारला योग्य उत्तर दिले जाईल, असा फतवा त्यांनी जारी केलाय. या फतव्यात त्यांनी इराणचे सर्वोच्च धर्मगुरू अयातुल्ला खोमेनी यांना धमकी देणारी व्यक्ती 'मोहारेबेह' म्हणजेच अल्लाहाविरुद्ध युद्ध पुकारणारा असल्याचं म्हटलयं.

फतव्यात काय म्हटलंय?

ट्रम्प आणि नेतन्याहूकडून इराणच्या सर्वोच्च नेत्याला धमकी

धमकी देणाऱ्यांविरोधात जगभरातील मुस्लिमांनी एकत्र या

शत्रूला ओळखून त्याचा बदला घ्या

हत्येचा कट आखणारा इस्लामिक कायद्यानुसार कठोर शिक्षेला पात्र

'मोहारबेह'नुसार गुन्हेगाराला मृत्युदंड, सुळावर चढवणे, हात-पाय कापणे अशा शिक्षा

फतव्याचे मुस्लिम व्यक्ती आणि इस्लामी शासनाने पालन करणं कर्तव्य

त्यामुळे एकीकडे इराण आणि इस्रायलमधील 12 दिवसांच्या युद्धानंतर, अमेरिकेने 24 जून रोजी युद्धबंदीची घोषणा केली. मात्र त्यानंतरही इस्रायलची आक्रमकता कायम आहे. इस्रायलने लेबनॉनवर हल्ला करुन इराणला पुन्हा इशारा दिला आहे. तिथल्या हिजबुल्लाह संघटनेला लक्ष केलं आहे. तर अमेरीकेचेही इराणबाबत भूमिक मवाळ झाली नाही.

या पार्श्वभूमीवर मौलवी नासेर शिराजींचा फतवा हा केवळ धार्मिकच नव्हे तर राजकीय दृष्ट्याही एक मोठे पाऊल मानले जातेय. आता इस्त्रायल- इराण यांच्यातील संघर्ष थांबणार की पुन्हा नव्यानं युद्धाचा भडका उडणार याकडे जगाचं लक्ष लागलयं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com