Bangladesh Dhaka Bus Accident 23 Passenger Death  Saam Tv
देश विदेश

Accident News : प्रवाशांनी खचाखच भरलेली बस नदीत कोसळली, २३ जणांचा दुर्दैवी मृत्यू

Bangladesh Bus Accident News Update : बांग्लादेशमध्ये प्रवाशांनी भरलेली बस पद्मा नदीत कोसळल्याने २३ जणांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Alisha Khedekar

  • बांग्लादेशमध्ये बस नदीत कोसळली

  • २३ प्रवाशांचा मृत्यू

  • अनेक बेपत्ता

  • बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

  • मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Bangladesh Dhaka Bus Accident 23 Passenger Death बांग्लादेशमध्ये प्रवाशांनी खचाखच भरलेली बस पद्मा नदीमध्ये कोसळली. बुधवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात २३ प्रवाशांचा मृत्त्यू झाला असून काल पासून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. सौदार्ह परिवहनची ही बस असून बोटमध्ये चढत असताना नियंत्रणाबाहेर जाऊन बस नदीत कोसळल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत मृत झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईदच्या सुट्ट्या संपवून अनेक जण ढाका येथे बसमधून परतत होते. प्रवाशांनी भरलेली बस राजबारी जिल्ह्यातील दौलतडिया टर्मिनल येथे फेरीकडे जात असताना एका छोट्या बोटला धडकली. या धडकेमुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट पद्मा नदीच्या पात्रात कोसळली. यावेळेस बसमध्ये सुमारे ४० प्रवासी होते.

अपघातानंतर घटनास्थळी खळबळ उडाली. दुर्घटनेची माहिती मिळताच लष्कर, पोलीस, अग्निशमन दल आणि तटरक्षक दल तातडीने घटनास्थळी पोचले आणि पथकांनी मिळून बचावकार्य राबवले.

सुमारे ६ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर क्रेनच्या साहाय्याने बसला नदीबाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत आतापर्यंत २३ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून बेपत्ता प्रवाशांचा शोध अद्याप सुरू आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून या अपघातानंतर मृत प्रवाशांच्या कुटुंबांवर हा दुखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

ठाणेकरांची चिंता वाढली; बारवी धरणात फक्त इतकाच पाणीसाठा शिल्लक

Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT