Bangladesh building fire at least 44 people killed many injured  Saam Tv
देश विदेश

Bangladesh Fire: बांगलादेशमध्ये भीषण आग, ४४ जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

Bangladesh Fire Latest Updaet News : आग लागलेल्या या इमारतीत जिथे अनेक रेस्टॉरंट आहेत. अग्निशमन दलाने बचावकार्य सुरू केले आहे.

प्रविण वाकचौरे

Bangladesh Fire News :

बांगलादेशची राजधानी ढाका येथे एका व्यावसायिका इमारतीला लागलेल्या भीषण आगाीत ४४ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आग लागलेल्या या इमारतीत जिथे अनेक रेस्टॉरंट आहेत. अग्निशमन दलाने बचावकार्य सुरू केले आहे. आतापर्यंत ७० लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे, ज्यामध्ये ४२ जण बेशुद्ध होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बांगलादेशचे आरोग्यमंत्री सामंत लाल सेन हे देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस, आरोग्य विभाग आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी प्रयत्न करत आहेत. बचावकार्य सुरू आहे. (Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री उशीरा या इमारतीला आग लागली. पहिल्या मजल्यावर असलेल्या कच्छी भाई रेस्टॉरंटमध्ये रात्री ९.४५ च्या सुमारास आग लागली. आग लगेचच इतर रेस्टॉरंटमध्ये पसरली. आग लागली ती वेळ हॉटेल्ससाठी गर्दीची वेळ होती. त्यामुळे हॉटेल्समध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. रेस्टॉरंटमध्ये असलेल्या गॅस सिलिंडर्समुळे ही आग वेगाने पसरली.

अग्नीशमन दलाच्या जवानांनी धक्कादायक माहिती दिली आहे. अनेकांनी इमारतीवरून उडी मारल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर गुदमरूनदेखील अनेकांचा जीव गेला आहे.

जखमींना ढाका मेडिकल कॉलेज आणि शेख हसीना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बर्न अँड प्लास्टिक सर्जरी येथे दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

SCROLL FOR NEXT