दिल्ली विकास प्राधिकरणाने (DDA) बुधवारी खजुरी खास परिसरात अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू केली होती, ज्यामध्ये अनेक घरे पाडण्यात आली आहेत. यात उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या रॅट मायनर वकील हसन यांच्याही घराचा समावेश आहे. नोव्हेंबरमध्ये बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
दिल्ली विकास प्राधिकरणाने त्यांना कोणतीही पूर्व माहिती दिली नव्हती, असा आरोप त्यांनी केला आहे. घर पाडल्यानंतर वकील हसन म्हणाले, आम्ही सिलक्यारा बोगद्यात ४१ लोकांना वाचवले आणि त्याच्या बदल्यात आम्हाला हे बक्षिस मिळालं आहे. यापूर्वी मी हे घर आमच्या ताब्यात देण्याची विनंती अधिकारी आणि सरकारकडे केली होती पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आज कोणतीही पूर्वसूचना न देता डीडीएच्या पथकाने त्याच्यावर बुलडोजर चालवला. मला आणि माझ्या मुलांना पकडून पोलीस ठाण्यात ठेवले आहे. त्यांनी आमच्यापैकी काहींना मारहाणही केली आहे त्यामुळे मदतीची मागणी त्याने केली आहे.
डीडीएने सांगितले की, 'नियोजित विकास जमिनीचा' भाग असलेल्या जमिनीवर अतिक्रमणविरोधी मोहीम राबवण्यात आली. कारवाईदरम्यान अनेक बेकायदेशीर बांधकामे पाडण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.28 फेब्रुवारी रोजी, DDA द्वारे खजुरी खास गावात अधिग्रहित जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी एक मोहीम राबवण्यात आली. ही जमीन नियोजित विकास जमिनीचा भाग होती. दरम्यान आदल्या दिवशी, हसनने या भागातील एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यात दावा केला होता की तो आणि त्याचे कुटुंब राहत असलेली इमारत या कारवाईत पाडण्यात आली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.