Siddharth Yadav Last Rites Saam Tv
देश विदेश

Siddharth Yadav Last Rites:'बेबी तू आया नहीं मुझे लेने...', लढाऊ विमान अपघातात शहीद झालेल्या पायलट सिद्धार्थच्या होणाऱ्या बायकोचा आक्रोश

Rajasthan Plane Crash: राजस्थानमध्ये लढाऊ विमानाचा अपघात झाला. या अपघातामध्ये पायलट सिद्धार्थ यादव शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या होणाऱ्या बायकोचे बेहाल झाले.

Priya More

गुजरातच्या जामनगर येथे बुधवारी जॅग्वार लढाऊ विमान अपघातात फ्लाइट लेफ्टनंट सिद्धार्थ यादवचा मृत्यू झाला. सिद्धार्थ यादव यांच्या पार्थिवावर शुक्रवारी हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी माजरा भालखी येथे लष्करी इत्मामात सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. सिद्धार्थ यादव यांच्या अंत्यसंस्कारामध्ये त्यांची होणारी बायको देखील सहभागी झाली होती.

सिद्धार्थ यांचा १० दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला होता. काही दिवसांनी त्यांचे लग्न होणार होते पण त्यापूर्वी त्यांच्या विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. त्यामुळे त्यांची होणारी बायको सानियाला मोठा धक्का बसला. सानियाचे रडून रडून बेहाल झाले. तिची अवस्था पाहून अंत्यसंस्कारासाठी उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले.

फ्लाइट लेफ्टनंट सिद्धार्थ यादव यांच्या जाण्याच्या त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. सिद्धार्थ यादव यांच्या पार्थिवाला आदरांजली वाहण्यासाठी हातात तिरंगा घेऊन अनेक माजी सैनिकांसह मोठ्या संख्येने नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली होते. सिद्धार्थ यादव यांचे पार्थिव घेऊन जाणाऱ्या वाहनावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. सिद्धार्थची होणारी बायको सानिया देखील अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित होती. होणाऱ्या नवऱ्याच्या जाण्यान सानियाला मोठा मानसिक धक्का बसला.

शहीद सिद्धार्थ यांचे पार्थिव पाहताच सानिया मोठ मोठ्याने रडू लागली. ती रडत म्हणत होती की 'बाळा, तू मला घ्यायला आला नाहीस... तू म्हणाला होतास की तू मला घ्यायला येशील.' सानियाला रडताना पाहून त्याठिकाणी उपस्थित असलेले सर्वजण रडू लागले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी देखील हैराण झाले आहेत.

बुधवारी रात्री जामनगर हवाई दलाच्या तळाजवळ झालेल्या विमान अपघातात सिद्धार्थ यादव (२८ वर्षे) या पालटचा मृत्यू झाला. सिद्धार्थ यादव यांचा नुकताच साखरपुडा झाला होता आणि यावर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांचे लग्न होणार होते, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. सिद्धार्थ यादव हे माजी सैनिकांच्या कुटुंबातील होते. त्याचे वडील सुशील यांनी भारतीय हवाई दलात सेवा बजावली होती आणि त्याचे आजोबा आणि पणजोबा देखील सैन्यात होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींना आज कामात अडथळे येतील; वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटे यांची अँजिओग्राफी केली जाणार

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT