Baba Vanga Prediction
Baba Vanga Prediction Saam Tv
देश विदेश

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भयंकर भविष्यवाणी ; २०२३ मध्ये...

वृत्तसंस्था

Baba Vanga Prediction : बल्गेरियाच्या बाबा वेंगा यांनी 2023 साठी केलेल्या भविष्यवाणीने लोक घाबरले आहेत. बाबा वेंगावर विश्वास ठेवणारे त्यांचे भाकीत बरोबर असल्याचा दावा करतात. बाबा वेंगा (Baba Vanga) यांनी अमेरिकेतील (America) 9/11 चा हल्ला आणि कुर्स्क पाणबुडी शोकांतिकेसह अलीकडच्या इतिहासातील काही सर्वात भयानक घटनांचा अचूक अंदाज लावला होता. दुसरीकडे, 2023 साठी भारतासह संपूर्ण जगासाठी बाबा वेंगा यांनी केलेले भाकीत लोकांना घाबरवणारे आहे.

2023 सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत बाबा वेंगा यांनी 2023 साठी कोणती भीतीदायक भविष्यवाणी केली आहे ते जाणून घेऊया.बाबा वेंगा यांनी 2023 साठी केलेल्या भाकितांमध्ये पृथ्वीवर एलियन्सचा हल्ला, अणुहल्ला आणि सूर्यावर त्सुनामी अशा प्रकारच्या काही भविष्यवाण्या केल्या आहेत. बाबा बेंगा यांनी त्यांच्या मृत्यूची तारीख 26 वर्षांपूर्वीच्या सांगितली होती, जी पूर्णपणे खरी ठरली.

बाबा वेंगा यांच्या समर्थकांचा असा दावा आहे की, त्यांनी 9 नोव्हेंबर 2001 रोजी अमेरिकेवर झालेल्या हल्ल्याचा अंदाज आधीच वर्तवला होता. जर त्यांची भविष्यवाणी गांभीर्याने घेतली असती तर कदाचित अमेरिकेत इतका मोठा हल्ला कधीच झाला नास्ता. बाबा वेंगा यांनी 2023 वर्षासाठी अनेक भविष्यवाण्या देखील केल्या आहेत, ज्यामध्ये त्यांनी पृथ्वीवर अंधार पसरण्याची आणि विनाशाची भविष्यवाणी केली आहे. बाबा वेंगाची ही भविष्यवाणी खरी ठरल्यास देशात मोठी समस्या निर्माण होऊ शकते.

कोण होते बाबा वेंगा

बाबा वेंगा या बल्गेरियाचे रहिवासी होत्या. बाबा वेंगा यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1911 रोजी झाला.त्या जन्मापासूनच आंधळ्या होत्या. 1911 मध्ये जन्मलेल्या बाबा वेंगा यांचे ऑगस्ट 1996 मध्ये स्तनाच्या कर्करोगाने निधन झाले. बाबा वेंगा यांनी बल्गेरियातील कोझुह पर्वताच्या रुपीट प्रदेशात आपले जीवन व्यतीत केले. त्यांचे खरे नाव वांगेलिया पांडेवा गुश्तारोवा होते, जे नंतर बाबा वेंगा म्हणून प्रसिद्ध झाले.

बाबा वेंगा यांनी 9/11 चा दहशतवादी हल्ला, ब्रेक्झिट यासारखे अनेक भाकीत केले होते, जे खरे ठरले. तसेच आफ्रिका-अमेरिकन वंशाचे बराक ओबामा हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतील,असा अंदाज देखील बाबा वेंगा यांनी आधीच वर्तवला होता. इतकंच नाही तर कोरोना साधीच्या आजाराबाबत देखील बाबा वेंगा यांनी भविष्यवाणी केली होती आणि ती खरी ठरली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Peruchi Chatani: चटकदार! कच्च्या पेरूची स्वादिष्ट चटणी, सोपी रेसिपी

Health Tips: जमिनीवर बसून जेवण करण्याचे फायदे माहिती आहेत का?

Amol Kolhe: आधी आरोप, आता थेट पुरावे दाखवले; अमोल कोल्हेंनी वाढवलं आढळराव पाटलांचं टेन्शन.. प्रकरण काय?

Nanded Temperature : नांदेड जिल्ह्यात उच्चांकी तापमानाची नोंद; पारा पोहचला ४३ अंशाच्या वर

Explainer : लोकल प्रवाशांची सहनशीलता संपलीय का? तुम्हाला काय वाटतं?

SCROLL FOR NEXT