Bharat Jadhav
जमिनीवर बसून जेवण खाण्याचे आहेत अनेक फायदे.
आयुर्वेदानुसार जेवताना जमिनीवर बसणे म्हणजे सुखासनात बसणे. याला क्रॉस-लेग्ड स्थितीत बसणं म्हटलं जातं.
जमिनीवर बसून जेवण केल्याने पोटाचे स्नायू सक्रिय होतात. त्यामुळे पोटात ॲसिड प्रमाण वाढून अन्न लवकर पचते.
जमिनीवर बसून जेवण केल्याने वजन कमी होण्यास मदत होत असते. बसून जेवण केल्याने लवकर पोट भरू लागल्या सारखं वाटतं.
जमिनीवर बसून जेवण केल्याने मेंदूला आराम मिळत असतो. बसून जेवण केल्याने पोटभरल्यासारखं वाटतं. कमी जेवण झाल्याने त्याच्या फायदा वजन कमी होण्यास होत असतो.
या सुखासन आसनात जेवण केल्याने संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण समान रीतीने होते. यामुळे शरीराच्या सर्व अवयवांना आराम मिळतो.
रात्रीच्या जेवणानंतर पचनास मदत करणारी बडीशेप, विनासुपारी पान, आवळा सुपारी ह्या सारख्या पाचक पदार्थ खावे