Bharat Jadhav
कच्चा आंब्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के सारख्या आवश्यक पोषक तत्व असतात.
कच्च्या आंब्यामध्ये असलेले उच्च जीवनसत्व सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. संसर्गजन्य आजारापासून संरक्षण देखील करतात.
आहारात कच्च्या आंब्याचा समावेश केल्याने शरीरातील द्रवपदार्थांची कमतरता भरून काढता येते आणि निर्जलीकरण टाळता येते.
कच्च्या आंब्यामध्ये कॅलरी आणि फॅट कमी असते, त्यामुळे तुम्ही तुमच्या वजन कमी करण्याच्या आहारात त्याचा समावेश करू शकता.
कच्च्या आंब्यात व्हिटॅमिन अ, आणि व्हिटॅमिन ई असते. या व्हिटॅमिनमुळे त्वचेचं आरोग्य उत्तम राहते.
कच्चा आंब्यामुळे शरीरात थंडावा राहत असतो. उन्हाळ्यात कच्चा आंबा खाल्याने आरोग्यासाठी उपयुक्त असतं. कच्चा आंबा किंवा कच्च्या आंब्यापासून बनवलेले पदार्थ खाल्ल्याने शरीराचे तापमान नियंत्रित राहते.
कच्च्या आंब्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. पोटॅशियम शरीरावर सोडियमचा प्रभाव कमी करून रक्तदाब नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
येथे क्लिक करा