Nanded Temperature
Nanded TemperatureSaam tv

Nanded Temperature : नांदेड जिल्ह्यात उच्चांकी तापमानाची नोंद; पारा पोहचला ४३ अंशाच्या वर

Nanded News : यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र मध्यंतरी झालेल्या अवकाळी पाऊस व वातावरणात झालेल्या बदलामुळे तापमानात घट झाली होती.
Published on

संजय सूर्यवंशी

नांदेड : मागील आठवडाभरापासून सूर्य आग ओकू लागला आहे. अवकाळी पावसानंतर तापमानात सातत्याने वाढ होत असून (Nanded) नांदेड जिल्ह्यात यंदाच्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे उन्हाच्या तीव्र झाला आता असह्य होऊ लागल्या आहेत. 

Nanded Temperature
Beed News : एटीएम मशीनच नेले चोरून; अंबाजोगाई शहरातील मध्यरात्रीची घटना

यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र मध्यंतरी झालेल्या अवकाळी पाऊस व वातावरणात झालेल्या बदलामुळे तापमानात घट झाली होती. मात्र मागील दोन आठवड्यांपासून तापमानात (Temperature) सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. यात नांदेड जिल्ह्यात तापमानाने नवा उच्चंक गाठला आहे. यंदाच्या सर्वाधिक तापमानाची (High Temperature) नोंद नांदेडमध्ये आज झाली आहे. 

Nanded Temperature
Railway Crime : तामिळनाडूहुन कल्याणला आलेली चोरट्यांची टोळी गजाआड; १२ गुन्हे उघडकीस

आज सकाळी ८ वाजून ३० मिनिटाला हवामान खात्याने घेतलेल्या नोंदीनुसार कमाल तापमान ४३ पूर्णांक २ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या आठवडाभरापासून उष्णतेची लाट कायम आहे. दुपारच्या वेळी महत्त्वाच्या कामाशिवाय नागरिकांनी बाहेर पडू नये. बाहेर पडल्यास उन्हापासून बचाव करण्यासाठी उपाय करावेत; असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com